Pune News: पुण्यातील नदी सुधार योजनेवर का घेतला जातोय आक्षेप?

Pune-Re : पुणे-री ही मोहीम PMCने मागे घेण्याचीही मागणी
Pune Riverfront Project (File)
Pune Riverfront Project (File) Tendernama
Published on

पुणे (Pune) : सदोष मुळा-मुठा नदी सुशोभीकरण (Mula-Mutha River Rejuvenation Project) प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांकडून (Students) प्रतिज्ञापत्र भरून घेणे योग्य नाही. या प्रकल्पाला नागरिकांचा पाठिंबा आहे, हे दर्शविण्यासाठी प्रशासनाकडून हा अट्टहास केला जात आहे, असा आरोप खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांनी पत्रकार परिषदेत केला. महापालिकेने सुरू केलेली पुणे-री (Pune-Re) मोहीम ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

Pune Riverfront Project (File)
Aurangabad: 20 वर्षांपासून रखडलेल्या 'या' रस्त्याचे काम सुरू होणार

याबाबत खासदार चव्हाण, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर चव्हाण म्हणाल्या, 'या प्रकल्पातील अनेक त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.'

Pune Riverfront Project (File)
Aurangabad:'या' खराब रस्त्यांचा पंचनामा करा;दोषींवर कारवाईची मागणी

राज्य सरकारच्या पातळीवर अनेक तज्ज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या. जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही, तोपर्यंत नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे, असे त्यामध्ये ठरले होते. परंतु, महापालिकेने प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरू ठेवले. शहरातील इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत. त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही, असेही चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com