Pune : पीएमसीने 'तो' प्रकल्प हटविण्याची गरज नाही; कोर्टाने काय दिला निकाल?

court
courtTendernama
Published on

पुणे, ता. १२ : बाणेर-सूस रस्त्यावर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ‘सीएनजी’साठीची स्लरी (लगदा) तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधीतील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. कचरा प्रकल्प हटविण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्‍यावर प्रक्रिया करताना परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, दर सहा महिन्यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) प्रकल्पाची तपासणी करावी, असे नमूद केले आहे.

court
Pune-Nagar Road : पुणे-शिरूर टप्प्यातील कोंडी फुटणार; समृद्धी महामार्गही पुण्याला...

महापालिकेने २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नोबेल एक्स्चेंज एन्व्हायर्न्मेंट सोल्यूशन्स कंपनीला काम दिले आहे. ओल्या कचऱ्यातून तयार होणारी स्लरी तळेगाव दाभाडे येथे नेली जाते. तेथे त्याद्वारे सीएनजी तयार केला जातो. पण बाणेर-सूस रस्त्यावरील प्रकल्पातून येणारी दुर्गंधी व अन्य तक्रारींमुळे स्थानिकांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाद मागितली होती. त्यावर २०२०मध्ये ‘एनजीटी’ने प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करावा व त्याचे क्षेत्र जैवविविधता उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणात बदलावे, असा निकाल दिला होता.

याविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी अॅड. निशा चव्हाण यांनी दिली.

court
Adani: धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला, पण कुणी नाही पाहिला! DRPPLने गुपचूप उरकला कार्यक्रम

यामुळे महापालिकेच्या बाजूने निकाल
- महापालिकेने विकास आराखड्यात जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित केली.
- २०१६ मध्ये प्रकल्प सुरू झाला, त्यानंतर लोकवस्ती वाढली.
- प्रकल्पाला सन २०००चे नियम लागू राहतील.
- जुन्या प्रकल्पाला नवीन नियमावली लागू करता येणार नाही, त्यामुळे महापालिकेच्या बाजूने निकाल

court
Mumbai : कोस्टल रोडचे आणखी एक पाऊल पुढे; 90 टक्के मोहिम यशस्वी, मार्च 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण

सर्वोच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश
- प्रकल्पात स्लरी तयार होणारा भाग व्यवस्थित झाकून दुर्गंधी बाहेर जाणार नाही, याची व्यवस्था करावी.
- प्रकल्पाची जागा अपुरी वाटत असल्यास पर्यायी जागेचा विचार करा किंवा अतिरिक्त जागा घेऊन काम करा.
- ओल्या कचऱ्याच्या बॅगांची साठवण योग्य पद्धतीने करावी.
- निर्माण होणाऱ्या स्लरीची गुणवत्तेची नियमित तपासणी करावी.
- ‘नीरी’ने कचरा प्रकल्पासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी नियमित करावी.
- कचरा प्रकल्पातील रिजेक्ट झाकण्यासाठी डिसेंबरअखेर शेड उभारावी.
- प्रकल्पाच्या परिसरात वृक्षारोपण करावे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com