Pune: शिवाजीनगर Metro स्टेशनमध्ये प्रवाशांची गैरसोय? नवा उपाय

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे हिंजवडी-शिवाजीनगर (Hinjewadi To Shivajinagar Metro) आणि वनाज-रामवाडी (Vanaj To Ramwadi Metro) हे दोन मार्ग एकत्र येतात. पण दोन्हीचे स्टेशन भिन्न असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता नवीन पादचारी मार्ग उभारून हे दोन्ही स्टेशन जोडले जाणार आहेत. यासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावास पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

Pune Metro
Nagpur : गणेश टेकडी उड्डाणपूल तोडणे सुरु;  त्या जागी होणार...

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. पुम्टाची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रो, आरटीओ, पीएमटी, वाहतूक पोलिस यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मेट्रो मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे.

Pune Metro
राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराला सत्तेत सहभागाबद्दल 40 कोटींचा निधी

काय आहे अडचण?

- वनाज ते गरवारे महाविद्यालय अशी धावणारी मेट्रो लवकरच वनाज ते रूबी हॉल क्लिनिक अशी धावणार आहे.

- शिवाजीनगर येथे वनाज ते रामवाडी, स्वारगेट ते पिंपरी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी हे तीन मेट्रो मार्ग एका ठिकाणी येतात.

- पण यातील दोन मार्गांचे काम महामेट्रो करत आहे तर हिंजवडी मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’कडून सुरू आहे.

- महामेट्रो आणि पीएमआरडीएचे मेट्रो स्टेशन यामध्ये सुमारे १६० मीटरचे अंतर आहे.

- हे स्टेशन जोडले गेले नसल्याने या दोन्ही स्टेशनवर ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मेट्रो स्टेशनवरून खाली उतरून पुन्हा दुसऱ्या मेट्रो स्टेशनमध्ये जावे लागणार आहे.

- यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

- हे लक्षात आल्याने पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्या माध्यमातून हा दोन्ही स्टेशनला जोडण्यासाठी दोन मजले वाढवून पादचारी मार्ग तयार केला जाणार आहे.

- यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च येणार असून, पीएमआरडीए आणि महामेट्रो हे दोन्ही ५० टक्के खर्च देणार आहेत.

Pune Metro
Nashik : सिटीलिंक बससेवा ठप्प; दोन वर्षांत 70 कोटींचा तोटा

शिवाजीनगर येथील हिंजवडी शिवाजीनगर आणि वनाज- रामवाडी हे दोन मार्ग एकत्र येतात. पण प्रवाशांना हे मार्ग बदलताना सुमारे १६० मीटर अंतर खाली उतरून जावे लागणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी दोन मजले वाढवून पादचारी मार्गाने दोन्ही स्टेशन जोडले जातील.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com