Pune : पुणे रल्वेस्टेशनवरून आता प्रवास होणार गतिमान, वेळही वाचणार; कारण...

Indian Railway
Indian RailwayTendernama
Published on

Pune News पुणे : रेल्वे बोर्डाने हडपसर ते घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स (जीसीएमसी) दरम्यान तिसरी मार्गिका व पुणे स्थानकावर अत्याधुनिक अशा ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ला मंजुरी दिली आहे. याकरिता सुमारे ९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तिसरी मार्गिका व ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मुळे रेल्वेप्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे.

Indian Railway
Nagpur : जाम प्रकल्पाच्या कालवा विकासासाठी मिळाले 92 कोटी

हडपसर ते जीसीएमसीदरम्यान २.५ किलोमीटर लांबीची एक मार्गिका सुरू होणार आहे. या सेक्शनमधील ही तिसरी मार्गिका असणार आहे. यामुळे हडपसर-जीसीएमसी-हडपसर या दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत व गतिमान होणार आहे. हे करीत असताना रेल्वे प्रशासन सिग्नल यंत्रणेच्या बाबतीत जगात प्रगत असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चा वापर करणार आहे.

पुणे स्थानकावर पहिल्यांदाच या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यासाठी पुणे स्थानकावरच्या सोलापूर दिशेने असलेल्या यार्डच्या जवळील भागात नवीन इमारत बांधली जाणार आहे. या यंत्रणेमुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याच्या प्रकाराला आळा बसेल. कधी बिघाड झाला, तर त्याचा शोध घेऊन तो तत्काळ दूर करणे सोपे होईल. याचा थेट परिणाम प्रवासी वाहतुकीवर होणार असून, रेल्वे प्रवास सुरक्षित होईल.

Indian Railway
Pune RTO : पुणे आरटीओचा 6 वाहन विक्रेत्यांना दणका; थेट परवानाच...

‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चा फायदा काय?

- पूर्वी सिग्नल देण्यासाठी केबिन मॅन हा रिव्हर ओढून सिग्नल देत असे. त्यानंतर पॅनेलवर बटण दाबून सिग्नल देण्यात येत होता. आता संगणकावर केवळ क्लिक करताच रेल्वेला सिग्नल मिळेल

- सिग्नलची प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पार पडेल

- या यंत्रणेसाठी कमीत कमी जागेचा वापर

- देखभाल करणे अगदी सोपे आहे

- सिग्नलमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण अत्यंत कमी

- बिघाड झाल्यास तो तत्काळ शोधून दूर करता येईल

Indian Railway
CAG Report : का बिघडले राज्याचे आर्थिक गणित? कॅगने का दिला शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दणका?

हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेचा फायदा काय?

पुणे स्थानकावर शंटिंगसाठी अथवा घोरपडी येथील पिट लाइनवर गाडी घेऊन जाण्यासाठी सोलापूर किंवा मिरज लाइनचा वापर होतो. रेल्वे अथवा इंजिन त्या लाइनवर येते, त्यावेळी त्या मार्गिका ब्लॉक होतात. परिणामी, दौंड किंवा मिरज येथून पुणे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यांना पुणे स्थानकाच्या होम सिग्नलवर थांबावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.

प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने हडपसर ते पुणे स्थानकादरम्यान तिसरी मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या मार्गिकेमुळे घोरपडीहून पुणे स्थानकावर रेल्वे येताना मिरज व सोलापूरच्या लाइनचा वापर होणार नाही. त्यामुळे त्या मार्गिका ब्लॉक होणार नाहीत. परिणामी, रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत राहील. तसेच भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यासाठीही तिसरी मार्गिका फायदेशीर ठरणार आहे.

Indian Railway
Bhandara : 336 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे होणार हरितक्रांतीचे लक्ष्य पूर्ण?

किमान ५० रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी १५ मिनिटे वाचतील

पुणे स्थानकावर एका शंटिंगसाठी सुमारे १५ मिनिटांचा वेळ लागतो. शंटिंग सुरू असते तेव्हा प्रवासी गाड्यांना थांबावे लागते. शंटिंग सुरू असल्याने व फलाट उपलब्ध नसल्याने रोज किमान ५० गाड्यांना होम सिग्नलवर १० ते १५ मिनिटे थांबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी हडपसर ते घोरपडीदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम होणार आहे.

हडपसर ते जीसीएमसीदरम्यान तिसरी मार्गिकेला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात करू. यासोबतच पुणे स्थानकावर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’चे काम केले जाणार आहे. त्यालादेखील मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही कामांमुळे रेल्वे सेवा गतिमान व सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com