Pune : रस्त्यांची नव्हे, तर कंत्राटदाराकडून महापालिकेच्या तिजोरीची 'सफाई'?

PMC
PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे (रोड स्वीपर) करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांसाठी ६० कोटी रुपयांचे टेंडर (Tender) काढले होते. पण त्यात ठेकेदाराने ३८ ते ८० टक्के जादा दराने टेंडर भरल्याने ते रद्द करण्यात आले. फेरटेंडर काढताना टेंडरची व्याप्ती वाढवून पाच वर्षांऐवजी सात वर्षांची मुदत करण्यात आली. अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्याने हा खर्च १६३ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत टेंडर तब्बल १०० कोटींनी फुगविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची सफाई होणार की करांच्या रकमेतून पुणेकरांनी भरलेल्या तिजोरीची, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

PMC
एसटीच्या ताफ्यात 'अशोक लेलँड'च्या लक्झरी बसेस; दिवाळीत 300 बस येणार

का फुगले टेंडर?

पूर्वीच्या टेंडरमध्ये बदल करून त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यामध्ये पाचऐवजी सात वर्षांचे टेंडर काढले. प्रत्येक परिमंडळाचा प्रतिवर्षाचा खर्च पाच कोटी ८३ लाख इतका झाला आहे. यापूर्वी हा वार्षिक खर्च चार कोटी ५१ लाख इतका होता. तसेच ठेकेदाराला त्याच्या गाड्यांचा वापर दोन वर्षे जास्त करता येणार असल्याने गाडीची किंमत वसूल होणार आहे.

या फेरटेंडरमध्ये पेव्हरमेंट स्वीपरच्या दोन मशिन वाढविण्यात आल्या. लीफ ब्लोअरमुळे कचरा धूळ पुढे ढकलली जाईल, प्रत्येक रस्त्याला दोन गाड्या असतील, झाडणकाम करण्यासाठी प्रत्येक रस्त्याला सात कर्मचारी असणार आहेत. एका परिमंडळात कचरा वाहतुकीसाठी पूर्वी एक वाहन (छोटा हत्ती) होते. आता तीन वाहने ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे टेंडर फुगले असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

PMC
Dharavi Redevelopment : लोकप्रतिनिधी आहात की अदानींचे एजंट? आशिष शेलार यांना बोचरा सवाल

पूर्वी अंदाज का घेतला नाही?

महापालिकेने पूर्वनगणननपत्रकात २०.८० कोटी इतका खर्च निश्‍चित केला होता. हे काम इतर शहरात यापेक्षा जास्त दराने केले जाते. महापालिकेचे पूर्वगणनपत्रक चुकले आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे, असे निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पात्र ठेकेदाराने ३८ ते ४० टक्के जादा दराने टेंडर भरले होते. ते रद्द करून फेरटेंडर काढले. त्यात महापालिकेने खर्च थेट दुपटीने वाढवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांचे पूर्वगणनन पत्रक तयार करताना वस्तुस्थिती लक्षात घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच पूर्वीचे टेंडर तीन परिमंडळासाठी होते, पण फेरटेंडरमध्ये परिमंडळ १, २, ३, ४ या परिमंडळातील १२ रस्त्यांचा समावेश केला आहे.

प्रतिकिलोमीटरचा खर्च १३३९ रुपये

फेरटेंडरमध्ये १२ रस्त्यांचा समावेश आहे. प्रत्येक रस्त्याची लांबी १० किलोमीटर आहे. स्वीपरने दुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी व रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्ग असे चार वेळा म्हणजे एका रात्रीत एका स्वीपरने ४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रतिकिलोमीटर १३३९ इतका खर्च निश्‍चित करण्यात आला आहे. यापूर्वीच्या टेंडरमध्ये हा खर्च प्रतिकिलोमीटर १०२३ रुपये इतका होता.

PMC
Tendernama Impact : 'वैद्यकीय शिक्षण'चा सुल्तानी निर्णय रद्द! 5 पट पठाणी शुल्क वसुलीचा वादग्रस्त निर्णय मागे

नेमके काय झाले?

- महापालिकेतर्फे २०१७ पासून शहरातील १२ रस्ते रोड स्वीपरने स्वच्छ करण्यास सुरुवात

- ठेकेदाराकडून व्यवस्थित काम होत नसल्याने रस्ते स्वच्छ होण्याऐवजी केवळ धूळ उडत असल्याचा अनुभव

- या टेंडरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने चार महिन्यांपूर्वी टेंडर काढली

- त्यामध्ये परिमंडळ १, ३ आणि ४ मधील प्रत्येकी ३ रस्त्यांची समावेश

- यासाठी प्रत्येक परिमंडळासाठी २०.८० कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक मंजूर

- यासाठी तीन परिमंडळासाठी ६२ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च येणार होता

- प्रत्यक्षात टेंडर भरताना पात्र ठेकेदाराने तिन्ही परिमंडळासाठी ३७ टक्के जादा दराने टेंडर भरल्याने सुमारे ३० कोटीने खर्च वाढणार होता

- त्यामुळे सप्टेंबर महिन्यात हे टेंडर रद्द करून फेरटेंडरचा निर्णय घेतला

PMC
Nagpur : 389 एकरात बनणार नरखेड एमआयडीसी फेज-2; येणार अनेक मोठे उद्योग

रोड स्वीपरसाठी इतर शहरांच्या महापालिकांपेक्षा पुणे महापालिकेचा दर कमी होता. त्यामुळे टेंडरला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. एका कंपनीने टेंडर भरले होते, पण त्यांचा दर खूप जास्त आल्याने टेंडर रद्द केले. आता पुन्हा टेंडर मागविण्यात आले असून, यामध्ये टेंडरची व्याप्ती वाढविल्याने खर्च वाढला आहे. हे काम व्यवस्थित होईल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाईल.

- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त

PMC
शहरी शाळांमध्ये पोषण आहाराचा ठेका देण्याचे सर्वाधिकार 'त्या' समितीला; टेंडर पद्धत बंद

असे आहे पूर्वगणनपत्रक

परिमंडळ क्रमांक - पूर्वीचा दर - फेरनिविदेतील दर (कोटी रुपयांमध्ये)

१ - २०.८० - ४०.८५

२ - ००० - ४०.८५

३ - २०.८० - ४०.८५

४ - २०.८० - ४०.८५

एकूण - ६२.४० - १६३.४०

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com