Pune News : मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी काय आहे Good News?

Metro (File)
Metro (File)Tendernama
Published on

Pune News पुणे : पुणे शहरातील पाच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी आणखी नवीन दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत. मेट्रो प्रवाशांसाठी सुविधा आणि प्रवेश क्षमता सुधारण्यासाठी याचा फायदा होणार आहे. (Pune Metro News)

Metro (File)
स्मार्ट प्रीपेड मीटर्स रद्द केल्याचे गाजर नको; अधिकृतपणे जाहीर करा तरच...

या पाच मेट्रो स्थानकांमध्ये पीएमसी, छत्रपती संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना, बोपोडी आणि कल्याणीनगर यांचा समावेश आहे. पीएमसी मेट्रो स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक २ आणि ३ हे दोन दरवाजे सुरू करण्यात आलेले आहेत.

हे दोन्ही दरवाजे नदीच्या कडेला असल्यामुळे प्रवाशांना मेट्रो फूट ओव्हर ब्रिजवर चढण्यासाठी रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनसाठीचे गेट क्रमांक २ आणि ३ हे जंगली महाराज रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आहेत.

Metro (File)
Bullet Train News : मुंबई-अहमदाबाद पाठोपाठ आणखी एका मार्गावर धावणार बुलेट ट्रेन

डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक २ आणि ३ हेसुद्धा जंगली महाराज रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आहेत. या सर्व मेट्रो स्टेशनच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या दरवाजांमुळे प्रवाशांना व्यस्त जंगली महाराज रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही.

Metro (File)
Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

बोपोडी मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक ४ आणि कल्याणीनगर मेट्रो स्टेशनसाठी प्रवेश व बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक ३ हे देखील प्रवाशांना व्यस्त रस्ता ओलांडल्याशिवाय पादचारी मार्गावर (फूट ओव्हर ब्रीज) चढण्यास मदत करणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com