Pune News : कोणी जागा देते का जागा! का खुंटला चाकण शहराचा विकास?

Chakan
ChakanTendernama
Published on

Pune News पुणे : गेली सात वर्षे चाकण नगरपरिषद अस्तित्वात आली, परंतु चाकण शहरात मूलभूत सोयी, सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. अगदी वर्दळीच्या चौकात सुलभ स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे प्रवाशी, नागरिकांची गैरसोय होत आहे. या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चाकण नगर परिषदेकडे हक्काची जागा नाही. चाकण नगर परिषदेला कोणी जागा देते का जागा, असा सवाल निर्माण झाला आहे.

Chakan
Pune Railway Station News : रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे वाचणार प्रवाशांचा वेळ; केवळ एका क्लिकवर...

चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जागा मिळविण्याच्या शोधात आहेत. परंतु शासन दरबारी पाठपुरावा करूनही जागा मिळत नाही. जागांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे जागा कशी मिळणार असा प्रश्न आहे.

चाकण (ता. खेड) येथे ग्रामपंचायत रद्द होऊन नगरपरिषद अस्तित्वात आली. गेली सात वर्षे नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात कारभार केला जात आहे. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतरही नागरिकांना प्राथमिक मूलभूत सोयी-सुविधाही मिळत नाहीत. शहरातील अंतर्गत अरुंद रस्ते, त्यावरच वाढलेली बेकायदा अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचे मोठे प्रमाण, शहरात नसलेले उद्यान, शहरात नसलेली स्वतंत्र भाजी मंडई, वर्दळीच्या मुख्य चौकात नसलेले सुलभ शौचालय, स्वच्छतागृह, नगरपरिषदेचा कचरा टाकण्यासाठी नसलेली नगरपरिषदच्या मालकीची जागा असे अनेक प्रश्न चाकण नगरपरिषदेला भेडसावत आहेत.

निवडणुका येतात आणि जातात मुख्याधिकारी बदलतात, परंतु नगरपरिषदेच्या हद्दीत अगदी मूलभूत सुविधाही निर्माण होत नाही हे भयानक वास्तव आहे. चाकण परिसराची लोकसंख्या अगदी दीड लाखावर गेलेली आहे.

Chakan
Nashik : निओमेट्रोचा भातुकलीचा खेळ संपण्याचे नाव घेईना; प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

नगर परिषदेच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो, तोही कमी दाबाने, काही भागात पाणी मिळते तर काही भागात पाणी मिळत नाही. अगदी पाणीपुरवठ्याच्या टाकीला ही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकांना अनेक सोसायटीत टँकरने पाणी विकत घ्यावे लागते, अशी भयानक अवस्था आहे. पाणीपुरवठा योजना कागदावर मंजूर झाली आहे, परंतु प्रत्यक्षात काम होत नाही. त्यामुळे नागरिक, कामगार संताप व्यक्त करत आहेत. चाकणला स्वतंत्र भाजी मंडई नाही. भाजी मंडई करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रस्त्यावरच बाजार भरतो. त्या बाजारामुळे रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते.

Chakan
Nashik News : नदीजोड प्रकल्पांचे DPR बनवण्याचे काम आणखी किती वर्षे चालणार?

अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत, कोणाची अतिक्रमणे काढायची हा प्रश्न निर्माण होतो. चाकणला भाजी मंडई साठी जागा नाही. सुलभ शौचालये, स्वच्छतागृहांसाठी जागा नाही. उद्यान करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे चाकणचा विकासच रखडलेला आहे. चाकण नगर परिषदेला शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. जागांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे कोणी जागा देत नाही हे वास्तव आहे. शहराचा विकास होण्यासाठी नगरपरिषदेला जागा मिळणे गरजेचे आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सांगितले की, नगरपरिषदेला मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जागा मिळत नाही. अनेक वर्षे शासनाकडे चाकणच्या कचरा प्रकल्पासाठी जागा मिळावी यासाठी मागणी केलेली आहे. परंतु अजूनही त्याला मूहर्त मिळाला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com