Pune News : शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीत का करण्यात आले बदल?

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

Pune News पुणे : शिवाजीनगर परिसरातील सिमला ऑफीस चौकात मेट्रोच्या गर्डरचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात कालपासून (ता. १९) वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजू चव्हाण यांनी दिली.

Pune Metro
Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी Good News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सिमला ऑफीस चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सूर्यमुखी दत्तमंदिर चौकाच्या (सेंट्रल मॉल चौक) पुढे कृषी महाविद्यालय (म्हसोबा गेट) समोरील पुलाच्या डाव्या बाजूने वीर चाफेकर चौकात (कृषी महाविद्यालय चौक) यावे.

तेथून डावीकडे न. ता. वाडी चौकातून (साखर संकुलसमोरील चौक) सरळ पुढे भुयारी मार्गातून इच्छित स्थळी जाता येईल. सिमला ऑफीस चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी न. ता. वाडी चौकातून उजवीकडे वळून सिमला ऑफीस चौकाकडे जाता येईल.

Pune Metro
Chandrapur : 'समृद्धी'साठी 73 गावांत जमिनीचे होणार भूसंपादन; आल्या नोटीस

फर्ग्युसन रस्त्यावरून सिमला ऑफीस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी वीर चाफेकर चौकातून उजवीकडे न वळता सरळ साखर संकुल रस्त्याने न. ता. वाडी चौकातून उजवीकडे वळून जावे. स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक) येथून सिमला ऑफीस चौकमार्गे औंध, बाणेर, पाषाणकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हॉटेल प्राइडसमोरील पुलावरून जावे.

तर शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुलाच्या उजव्या बाजूने वीर चाफेकर चौकातून उजवीकडे वळून न.ता. वाडी चौकातून जावे. वाकडेवाडी येथील भुयारी मार्गातून न. ता. वाडी चौकाकडे येणाऱ्या केवळ दुचाकींना प्रवेश असेल. मात्र, या भुयारी मार्गातून तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंद राहील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com