Pune : चांगली बातमी; पुणे विमानतळावरील 'या' सेवेचा लवकरच विस्तार

Cargo Service
Cargo ServiceTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) २.५ एकर जागेवर कार्गोसेवेचा (Cargo Service) विस्तार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या जून महिन्यापासून याच जागेवरून कार्गोची सेवा सुरू होत आहे. सध्याच्या तुलनेत ही जागा मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होण्यास मदत होणार आहे. याचा थेट फायदा पुण्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना होणार आहे. ते आपला माल गतीने पाठवू शकतील. यातून विमान कंपन्यांना देखील चांगले उत्पन्न मिळणार आहे.

Cargo Service
Nashik: गुलाबराव पाटलांच्या हस्ते 2560 कोटीच्या योजनांचे भूमीपूजन

पुणे विमानतळावर कार्गोसेवेचा विस्तार करण्यासाठी जागेची मोठी अडचण होती. मागच्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने पुणे विमानतळ प्राधिकरणाला दोन एकर जागा वार्षिक एक रुपयाच्या भाडे तत्त्वावर देण्यास मंजुरी दिली. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने ही जागा एक वर्षासाठी एक कोटी ३० लाख रुपये भाड्याने देण्याचे मान्य केले होते.

हे भाडे जास्त होते. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांनी प्रयत्न करून अवघ्या एक रुपयांत विमानतळाला पाच वर्षांसाठी ही जागा मिळवून दिली. त्या जागेवर आता कार्गोसाठी आवश्यक असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल महिन्यात हे काम पूर्ण होईल. मात्र, कार्गोसाठी आवश्यक ती मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला जून महिना उजाडेल, अशी शक्यता विमानतळ प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Cargo Service
Pune : पुणेकरांच्या स्वप्नावर एअर इंडियाने फिरवले पाणी; कारण...

प्रवाशांनादेखील फायदा
पुणे विमानतळावर प्रवासी व कार्गोसेवेला चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र, आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्याने या सेवेचा विस्तार होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या एक एकर जागेवर कार्गोसेवा चालते. मात्र, ही जागा विमानतळावरील एक व दोन क्रमांकाच्या टर्मिनलच्या मध्ये येत असल्याने दोन्ही टर्मिनल एकमेकांना जोडण्यात अडचणी येत होत्या.

आता मात्र जून महिन्यापासून नव्या जागेत म्हणजे २.५ एकर जागेत स्थलांतर होत आहे. त्यामुळे टर्मिनल एक व टर्मिनल दोन एकमेकांना जोडता येईल. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. प्रवाशांना एका टर्मिनलमधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जाता येईल. परिणामी एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होणार नाही, तर दुसरा फायदा असा की कार्गोसेवेचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.

Cargo Service
Airport : 14 वर्षे झाली; यवतमाळवासीयांचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

‘बीसीएएस’कडून सोमवारी पाहणी
सध्या पुणे विमानतळावरून दोन विमान कंपन्यांच्या माध्यमातून कार्गोसेवा सुरू आहे. एअर इंडियानेदेखील कार्गोसेवा सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. त्या पार्श्वभूमीवर ‘बीसीएएस’च्या (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) पथकाने सोमवारी पुणे विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्गोसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, सुरक्षा आदींबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चादेखील केली. सध्या पुणे विमानतळावरून देशांतर्गत कार्गोसेवा सुरू आहे.

Cargo Service
Nashik : उद्यान देखभालीच्या आडून राजकीय कार्यकर्त्यांसाठी टेंडर?

नव्या जागेत कार्गोचे काम सुरू आहे. जून महिन्यात २.५ एकर जागेतून कार्गोसेवा सुरू होईल. कार्गोसेवेचा विस्तार होत असल्याने त्याचा फायदा व्यवसायिकांना होणार आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com