पुणे महापालिकेवर नामुष्की; शुद्ध पाण्यासाठी नदीखालून पाइपलाइन...

Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationTendernama
Published on

पुणे (Pune) : शहरातील शुद्ध केलेले मैलापाणी मुंढवा जॅकवेल येथून पाइपलाइनने बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते. पण, या पाण्यात इतर ठिकाणचे अशुद्ध पाणी जमा होत आहे. त्यामुळे शेतीला अयोग्य पाणी दिले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे केली. त्यावर उपाय म्हणून या जॅकवेलच्या शेजारी असलेल्या खराडी मैलाशुद्धिकरण केंद्रातील पाणी बेबी कॅनॉलमध्ये टाका असा आदेश दिला आहे. महापालिकेनेही हा आदेश मान्य करत, या प्रकल्पासाठी तयार दर्शविली आहे. मात्र, हा प्रकल्प म्हणजे द्राविडी प्राणायाम ठरणार असून, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नदीच्या खालून पाइपलाइन टाकायची नामुष्की महापालिकेवर येणार आहे.

Pune Municipal Corporation
केंद्राचा खासगीकरणाचा सपाटा; JNPAचे अखेरचे टर्मिनलही 'या' कंपनीकडे

अशी आहे स्थिती
- पुणे महापालिकेचा पाटबंधारे विभागासोबत करार
- त्यानुसार शहरातील मैलापाणी शुद्ध करून वर्षाला ६.५ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक
- त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च
- पुणे महापालिकेने मुंढवा बंधारा येथे जॅकवेल बांधले
- तेथून बेबी कॅनॉलपर्यंत मोठी जलवाहिनी टाकली
- पुणे शहरातील दहा मैलाशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी नदीत सोडले जाते
- हे पाणी मुंढवा बंधारा येथे अडवून तेथून ते जॅकवेलमध्ये पंपिंग करून बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते

Pune Municipal Corporation
लष्कराच्या निर्णयाने पुणे-मुंबई मार्गाचा श्वास मोकळा!अडीच किमीसाठी

नदीच्या खालून जलवाहिनी
नदीच्या एका बाजूला मुंढवा जॅकवेल आहे. तर दुसऱ्या बाजूला खराडी मैलाशुद्धीकरण केंद्र आहे. खराडी केंद्रातून २४ तासात केवळ ४० एमएलडी पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाते. तर त्याउलट मुंढवा जॅकवेलमधून रोज ५०० एमएलडी पाणी बेबी कॅनॉलमध्ये सोडण्याची क्षमता असून, सध्या ३०० ते ४०० एमएलडी पाणी रोज शेतीसाठी दिले जात आहे. प्राधिकरणाच्या आदेशानुसार ४० एमएलडी पाणी शेतीसाठी द्यायचे झाले तर महापालिकेला पंपिंग स्टेशन उभारावे लागेल, त्यानंतर नदीच्या खालून सुमारे एक किलोमीटरची जलवाहिनी टाकावी लागेल. ही जलवाहिनी जॅकवेल येथील मोठ्या जलवाहिनीला जोडावी लागणार आहे. असा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने आयुक्तांकडे सादर करून त्यास मान्यता घेतली आहे. त्याचे टेंडर मलःनिसारण विभागाकडून काढली जाणार आहे.

Pune Municipal Corporation
पुणे-मुंबई प्रवास आता होणार अधिक आरामदायक! एसटीचा मोठा निर्णय...

प्रकल्प अव्यवहार्य ?
दरम्यान, खराडीतील पाणी बंद जलवाहिनीतून शेतीला देण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिले आहेत. पण, नदीच्या खालून जलवाहिनी टाकणे सोपे काम नाही. तसेच ४० एमएलडी हे खूप कमी पाणी आहे. हे पाणी जॅकवेलच्या जलवाहिनीला जोडल्यानंतर शेतीला खूप शुद्ध पाणी मिळेल असे नाही. पण, याप्रकल्पासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च होतील, त्यामुळे हा प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मैलाशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी शुद्ध केले जात असले तरी शहराच्या इतर भागातील मैलापाणी प्रक्रियेविना थेट नदीत येत आहे. त्यामुळे शुद्ध पाण्यात हे अशुद्ध पाणी जमा होऊन ते मुंढवा बंधारा येथे येत असल्याने बेबी कॅनॉलमध्ये देखील अशुद्ध पाणी जात असल्याची तक्रार महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे केली. त्यावर सुनावणी झाली असता, महापालिकेने शेतीसाठी शुद्ध पाणी द्यावे त्यासाठी खराडी मैलाशुद्धीकरण केंद्रातून थेट शुद्ध केलेले पाणी उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश दिला आहे.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com