Pune : कचऱ्याचे ढीग साचल्यानंतर घनकचरा विभागाला आली जाग; रिटेंडर काढून...

Pune : कचऱ्याचे ढीग साचल्यानंतर घनकचरा विभागाला आली जाग; रिटेंडर काढून...
Published on

पुणे (Pune) : शहरातील बहुतांश भागातील रस्ते आणि उड्डाणपुलावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यावरून ओरड झाल्यानंतर घनकचरा विभागाला जाग आली असून, क्षेत्रीय कार्यालयांमार्फत रस्ते व उड्डाणपूल स्वच्छ करण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.

Pune : कचऱ्याचे ढीग साचल्यानंतर घनकचरा विभागाला आली जाग; रिटेंडर काढून...
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट; दुसऱ्याच दिवशी...

शहरातील मोठे रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता मेकॅनिकल स्विपिंगद्वारे केली जाते. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी ही स्वच्छता करण्यात येते. मात्र, हडपसर वानवडी परिसर वगळता उर्वरित शहरातील मेकॅनिकल स्विपिंगचे कंत्राट फेब्रुवारी महिन्यांत संपले आहे. प्रशासनाने या कामासाठी टेंडर काढले होते. परंतु, त्या जादा दराने आल्याने त्या रद्द करून रिटेंडर काढण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला.

Pune : कचऱ्याचे ढीग साचल्यानंतर घनकचरा विभागाला आली जाग; रिटेंडर काढून...
Pune : मुख्यमंत्री साहेब, 'ती' जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी काढलेले टेंडर रद्द करणार का?

दरम्यान, शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांच्याकडेला आणि उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला. त्याबाबतची ओरड सुरू झाल्यानंतर त्याची दखल घेत घनकचरा विभागाने शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com