कात्रज-कोंढवा रोडची कोंडी फोडण्यासाठी हवेत तब्बल 'एवढे' कोटी

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : भूसंपादन रखडल्याने कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रकल्प ठप्प झालेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांच्यासह पाहणी केली. भूसंपादनासाठी किमान साडे सातशे कोटी रुपये आवश्‍यक असल्याने चांदणी चौकाप्रमाणे राज्य सरकारकडून मदत होईल का यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Pune
रायगडमध्ये जमीन मोजणी आता सुपरफास्ट! 'या' यंत्रामुळे वाढणार अचूकता

कात्रज कोंढवा रस्त्याच्या परिसरात दाट लोकसंख्या असताना या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर दिवस रात्र वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांमध्ये आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यासाठी २०१८ मध्ये कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाची मुदत २०२१ मध्ये संपली पण केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने जागा मालकांच्या अनेकदा बैठका घेतल्या, पण रोख स्वरूपात नुकसान भरपाई मागितली जात असल्याने त्यासाठी महापालिकेला किमान ७५० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च परवडणारा नसल्याने जागा ताब्यात आलेली नाही. याप्रकल्पाची मुदत संपल्यानंतर आता दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

Pune
सरकार बदलल्यास नागपूर सुधार प्रन्यासचे काय होणार? कर्मचारी चिंतेत

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या साडेतीन किलोमीटर मार्गाची पाहणी करताना महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या. तेथे काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी भूसंपादन हाच मुख्य अडसर असल्याचे आयुक्तांना सांगण्यात आले. त्यावर तोडगा काढण्यासाठी चांदणी चौकात ज्या प्रमाणे भूसंपादनासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे येथेही मदत करावी यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल. त्यासाठी सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यात सांगितले.

Pune
लष्कराच्या निर्णयाने पुणे-मुंबई मार्गाचा श्वास मोकळा!अडीच किमीसाठी

अशी आहे स्थिती
- कात्रज कोंढवा रस्ता साडेतीन किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद
- त्यामध्ये ग्रेडसेपरेटर प्रस्तावित
- प्रकल्पासाठी एकूण २ लाख २८ हजार चौरस मीटर जागा आवश्‍यक
- चार वर्षांत केवळ ६७ हजार चौरस मीटर जागा ताब्यात
- ५८ हजार चौरसमीटर जागा रस्ताच्या माध्यमातून उपलब्ध
- अजून १ लाख २८ हजार चौरस मीटर जागा प्रकल्पासाठी आवश्‍यक
- या प्रकल्पाचे २८ टक्के काम झालेले असले तरी ते सलग नाही
- ढिगळे जोडल्याप्रमाणे अनेक ठिकाणी काम झाले असल्याने त्याचा नागरिकांना उपयोग नाही

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com