Pune : परस्पर रस्ते खोदाईला ब्रेक; अतिरिक्त आयुक्तांची परवानगी घेणे अनिवार्य

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : रस्ता नव्याने डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसांतच परस्पर खोदाई करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या प्रकरणात एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबितही करण्यात आले आहे. यानंतर पथ विभाग आणि पाणीपुरवठा विभागाने रस्ते खोदाईबाबत समन्वय ठेवण्यासाठी बैठक घेतली. दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी) रस्ता खोदायचा असेल, तर त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्तांची परवानगी घेणे अनिवार्य असल्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

PMC Pune
एमटीएचएलचे 98 टक्के काम पूर्ण; प्रकल्प खर्चात 2 हजार कोटींची वाढ

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही बैठक घेतली. त्या वेळी पाणीपुरवठा विभाग, पथ विभागाचे अधिकारी तसेच समान पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. पाषाण रस्त्यावर काही दिवसांपूर्वीच केलेला रस्ता खासगी ठेकेदाराने खोदला. या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी एका कनिष्ठ अभियंत्याला निलंबित केले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पथ व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाची बैठक घेतली आहे.

PMC Pune
Pune : पुणेकरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय; लवकरच करणार...

पाणीपुरवठा विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी रस्ते खोदाईसाठी अनेक महिन्यांपूर्वीच परवानगी घेतली आहे. मात्र अशा जुन्या परवानग्यांनुसार काम सुरू करण्यापूर्वी पथ विभागाला त्याची माहिती देणे अनिवार्य आहे. जर पथ विभागाने नुकतेच डांबरीकरण केले असेल तर अशा ठिकाणी जुनी परवानगी असली तरीही पाणीपुरवठा विभागाला काम करता येणार नाही. काही ठिकाणी जुनी परवानगी आहे, असे सांगत पथ विभागाला न सांगता खोदकाम केले जात आहे, त्याबद्दल चौकशी झाल्यानंतर अधिकाऱ्यांना व्यवस्थित स्पष्टीकरण देणेही अवघड जात आहे. त्यामुळे परस्पर खोदाई करता येणार नाही, असे बैठकीत ठरल्याचे पावसकर यांनी सांगितले.
शहरात महापालिकेने सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून १०० किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. हे रस्ते ‘डीएलपी’मधील आहेत. त्यामुळे अशा महत्त्वाच्या रस्त्यांसह इतर रस्त्यांवर खोदकाम करायचे असल्याचे त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांमार्फत परवानगी घेणे अनिवार्य आहे. दरम्यान, ‘डीएलपी’मधील रस्त्याचे परस्पर खोदकाम केल्याने ठेकेदाराची जबाबदारी आपोआप संपते, त्याचा फटका महापालिकेला बसतो. त्यामुळे ‘डीएलपी’मधील रस्त्यावर खोदकाम करण्याची परवानगी दिला जाणार नाही. मात्र तातडीचे काम असले तरीही अतिरिक्त आयुक्तांची परवानगी आवश्‍यक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com