पुण्यातील नदी काठ सुधार प्रकल्पाचे बनविणार दोन मॉडेल, कारण...

Mutha River
Mutha RiverTendernama
Published on

पुणे (Pune) : नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प कसा असेल, नदीचा काठ सुशोभित करताना त्यात कोणत्या सुविधा असतील, त्याचे काम कसे असेल? हे पुणेकरांना कळावे, यासाठी दोन मॉडेल तयार केले जाणार आहेत. हे दोन्ही मॉडेल बंडगार्डन पुलाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला असण्याची शक्यता आहे.

Mutha River
'नदी काठ सुधार प्रकल्पाची बैठक घेण्याचा शरद पवारांना काय अधिकार?'

मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेतील ११ पैकी पहिल्या दोन टप्प्यातील टेंडरला मंजुरी मिळाली आहे. ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. दरम्यान, या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे गंभीर परिणाम होतील, पुण्याला पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर अभ्यास करणे गरजेचे आहे, असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. त्यानंतर पर्यावरणप्रेमी संघटना, जलसंपदा विभाग व महापालिकेच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठका सुरू असल्या, तरी प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून सर्वेक्षण करणे व आदी तांत्रिक कामेही सुरू झाली आहेत, त्याचा आढावा नुकताच घेण्यात आला. हा प्रकल्प नागरिकांना समजणे आवश्‍यक आहे, त्यासाठी डेमो तयार करावा, अशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार तयारी सुरू केली आहे.

Mutha River
पुण्यात नदी सुधार, पीपीपी रस्त्यासाठी मिळणार तब्बल 'एवढे' कोटी?

संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामापैकी येरवडा येथील शादलबाबा दर्ग्यामागील २०० मीटर नदीकाठ आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर दरम्यानच्या २५० मीटरचा नदीकाठ ‘मॉडेल’ म्हणून विकसित केला जाणार आहे. हे काम करताना जायका कंपनीच्या नदी सुधार योजनेतील कामेही केली जाणार आहेत.

Mutha River
पुण्यातील नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यानंतर 'हा' उभारणार पर्याय

...याचा समावेश असेल
या दोन टप्प्यातील मॉडेल तयार करताना त्यात नदीकाठ सुधार योजनेतील नदीच्या काठावर पिचिंग, त्याला बसविलेली जाळी, पायथ्याशी भिंत, सायकल ट्रॅक, रस्ता, वृक्षारोपण, नागरिकांना बसण्यासाठीची सुविधा यासह इतर सुशोभीकरणाची कामे केली जातील.

‘‘मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेचे स्वरूप कसे आहे, हे नागरिकांना समजावे यासाठी दोन्ही टप्प्यात २०० व २५० मीटरचा भाग मॉडेल म्हणून विकसित केला जाणार आहे. हे काम लवकरच सुरू होईल. या मॉडेलवर नागरिक, तसेच तज्ज्ञांचा सूचना मागविण्यात येतील. योग्य ठिकाणी बदल करून उर्वरित प्रकल्पाचे काम केले जाईल.’’
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com