पुणे-मुंबई प्रवास आता होणार अधिक आरामदायक! एसटीचा मोठा निर्णय...

E Shivneri
E ShivneriTendernama
Published on

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाची पहिली ई-बस शिवाई पुण्यातून धावल्यानंतर आता ई-शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. पुणे विभागाला ई-शिवनेरीच्या ९६ बस मिळणार आहेत. त्यासाठी नव्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू झाले आहे. पुण्याहून ई-शिवनेरी दादर, परळ, ठाणे व बोरिवली या ठिकाणी धावणार आहे. यासाठी पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये १७ चार्जर उभारले जाणार आहेत.

E Shivneri
१३८ कोटींच्या लोअर परळ उड्डाणपूलाचा मुहूर्त फिक्स!

पुणे-नगर ई-शिवाई बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता एसटी प्रशासन आता ई-शिवनेरी बसेस सुरू करणार आहेत. त्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस वापरल्या जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथे बसेसची निर्मितीही सुरू केली आहे. या नव्या बसेस आताच्या शिवनेरीच्या तुलनेने खूपच अत्याधुनिक व प्रगत प्रणालीचा वापर करून तयार केल्या जात आहेत. तसेच ग्रीनसेल मोबिलिटीने तयार केलेल्या ई-शिवाईच्या तुलनेत अधिक आरामदायक असतील. यामधून प्रवास करताना प्रवाशांना खड्ड्यांतून बस गेल्यास हादरे बसणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. ई-शिवनेरी बस आता धावणार असल्याने सध्या डिझेलवर धावत असलेल्या शिवनेरी लवकरच सेवेतून बाद होण्याची शक्यता आहे.

E Shivneri
नगरनंतर आता 'शिवाई' ई-बस धावणार पुण्यातून 'या' शहराकडे

चार्जिंग स्टेशनचे काम सुरू
पुण्याच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारात मोठे चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरु आहे. येथे १७ चार्जर असतील. त्यामुळे एकावेळी १७ बस चार्ज केल्या जातील. यासाठी पुणे विभागाच्या विद्युत विभागासह राजू पवार, अंकेशकुमार विश्वकर्मा व अँथनी फर्नांडिस मेहनत घेत आहेत.

E Shivneri
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय; आता तिकीटासाठी येणार...

पुणे विभागाला मिळणार ई-शिवनेरी बस : ९६
पुणे-दादर : २४ बस
पुणे-ठाणे : २४ बस
पुणे-परळ : २४ बस
पुणे-बोरिवली : २४ बस

E Shivneri
खुशखबर! 'एसटी'त नव्याने 5 हजार चालकांची भरती; तारीख ठरली...

पुण्यात जुलैमध्ये १७ ई-शिवाई
पुणे-नगर मार्गावर धावणाऱ्या ई-शिवाई बसेसच्या संख्येत वाढ होणार आहे. पुणे विभागाला जुलै महिन्यात आणखी १७ ई-बस मिळणार आहे. त्यामुळे पुणे-नगर मार्गासह पुणे-कोल्हापूर व पुणे-नाशिक मार्गावरही ई-शिवाई धावणार आहे. सध्या चार बसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे.

E Shivneri
...अन् पुन्हा इतिहास घडला! 'या' मार्गावर धावली ST ची पहिली E-Bus

पुण्याला ९६ ई-बस मिळणार आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. या बसेस तुलनेने अधिक आरामदायक असतील. त्यामुळे प्रवाशांना वेगळा अनुभव मिळेल.
- यामिनी जोशी, उपसरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com