Pune Metro: स्ट्रक्चरल ऑडिटबाबतच्या गोंधळाला जबाबदार कोण?

Metro (File)
Metro (File)Tendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro) स्ट्रक्चरल ऑडिटबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) दोन तज्ज्ञांची समिती नियुक्त करून चुका आढळल्यास आता अहवाल देणार आहे. तर, पूर्वीचा अहवाल अधिकृत असल्याचे महामेट्रोचे (MahaMetro) म्हणणे आहे.

Metro (File)
Thane: नालेसफाईत कोणी केली 10 कोटींची हातसफाई?

महामेट्रोच्या वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मार्गावरील वनाज, नळस्टॉप, आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय स्थानकांचे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांच्या एका गटाने महामेट्रोला कळविले होते. तसेच त्यांनी या बाबत केंद्रीय रेल्वे सुरक्षा मंडळाशीही संपर्क साधला होता.

दरम्यान, वापरात आलेल्या मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला. त्यासाठी ‘सीओईपी’कडून हे ऑडिट करण्यासही सांगितले होते. मात्र, सीओईपीमधील ज्या प्राध्यापकाने हे ऑडिट केले, ते अधिकृत नसल्याचे सीओईपीने म्हटले आहे.

Metro (File)
Nashik ZP : 2538 पदांची लवकरच आयबीपीएसच्या माध्यमातून भरती

या पार्श्वभूमीवर ‘सीओईपी’ प्रशासनातील नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘मेट्रोने कधी कोणाशी संपर्क साधला, पैसे भरले का, अहवाल कोणाकडून घेतला, यावर आम्ही काही बोलणार नाही. आम्ही दोन तज्ज्ञांची समिती नियुक्त करू. त्यांच्याकडून पाहणी केली जाईल. स्थानकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये चुका आढळल्यास अहवाल सादर करू.’’

Metro (File)
EV: नाशिककरांना महिनाभरात मिळणार ही Good News; लवकरच निघणार टेंडर

स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सीओईपीच्या स्थापत्य शास्त्र विभागाच्या प्रमुखांना आम्ही पत्र लिहिले होते. त्यांनी एक प्राध्यापक नियुक्त केले. त्यासाठी १५ लाख रुपयांचे शुल्क सीओईपीच्या बॅंक खात्यातही भरले. त्यानंतर एक महिन्याने आम्हाला अहवाल मिळाला. ज्यांनी अहवाल सादर केला ते संबंधित प्राध्यापक तज्ज्ञ आहेत. त्यांचे आणि सीओईपी प्रशासनातील संबंध, हा आमचा विषय नाही. आम्हाला मिळालेला अहवाल अधिकृत आहे, असे आम्ही गृहित धरले आहे.
- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com