Pune : मुंबईप्रमाणेच पुण्यातील High-Rise इमारतींची संख्या वेगाने वाढतेय! काय आहे कारण?

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : मुंबईप्रमाणेच पुणे शहराच्या उपनगरांतही आता गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. आत्तापर्यंत १०० मीटर उंचीपेक्षा जास्त १९ प्रकल्पांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. प्रथमच महापालिकेकडून १६० मीटर म्हणजेच ४० मजली इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही इमारत बोपोडीमध्ये उभी राहणार आहे, तर आत्तापर्यंत बाणेर, बालेवाडी, खराडी, वडगाव शेरी या भागात सर्वाधिक उंचीच्या इमारतींना बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.

Pune
Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

संगमवाडी, बिबवेवाडी, औंध, येरवडा आदी भागांत यापूर्वी १०० मीटरच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, तर शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवार आणि सोमवार पेठेत प्रत्येकी ८२.५ मीटर आणि १०४ मीटरच्या उंचीच्या इमारतींना परवानगी दिली आहे.

पुणे शहराची लोकसंख्या वाढत असताना राज्य सरकारने वेळोवेळी हद्दवाढ केलेली आहे. यामध्ये १९९७ मध्ये २३ गावे घेतली, त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये २०२१ पर्यंत ३५ गावांचा समावेश शहरात करण्यात आला.

हद्दवाढ होत असताना या उपनगरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अनेक मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे. शहरात खराडी, वडगाव शेरी, बाणेर, बालेवाडी या भागांत आयटी कंपन्यांची संख्या जास्त असल्यानेच याच भागात सर्वाधिक सदनिका घेण्याचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारतीदेखील याच भागांत जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Pune
Nashik : स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत 'या' कारणांमुळे नाशिक मागे पडतेय का?

रस्ता रुंदी आणि भूखंडाचे क्षेत्रफळ विचारात घेऊन ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारत बांधण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून प्रस्तावांची छाननी करून प्रकल्पांना मान्यता दिली जात होती.

मध्यंतरी हे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायराइज कमिटीची ९ जानेवारी रोजी बैठक झाली. या बैठकीत आत्तापर्यंतच्या सर्वांत उंच म्हणजे १६० मीटर उंचीच्या इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने आत्तापर्यंत ४१ उंच प्रस्तावांना मान्यता दिली आहे. त्यापैकी १५ प्रकल्प हे १०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती आहेत.

Pune
Nashik : जल जीवनच्या योजनांसाठी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय; आता ग्रामपंचायतींचे वीजपंपांचे देयक...

भाग आणि प्रकल्प संख्या

बाणेर - ५

बालेवाडी -५

खराडी - ४

वडगाव शेरी -४

बिबवेवाडी - ३

एरंडवणे - ३

गुलटेकडी -३

येरवडा- २

मुंढवा -२

संगमवाडी -१

शुक्रवार पेठ -१

औंध - १

कोंढवा -१

वानवडी - १

घोरपडी - १

मंगलदास रस्ता - १

महंमदवाडी - १

बोपोडी - १

सोमवार पेठ - १

Pune
Nashik : येवल्यासाठी छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज! 'या' कामांसाठी तब्बल 10 कोटींचा...

शहरात उंच इमारती बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. २४ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील तसेच सर्व निकषांची पूर्तता करत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या बांधकाम प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी करून या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com