Pune: खडकवासला-खराडी मेट्रोच्या प्रस्तावाला गती मिळणार? कारण...

Khadakwasla To Kharadi Metro Line
Khadakwasla To Kharadi Metro LineTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रशासनाने २०१८ मध्ये तयार केलेला ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ अद्ययावत केला जाणार आहे. पुणे शहर (Pune City), पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि ‘पीएमआरडीए’च्या (PMRDA) हद्दीत वाढलेली लोकसंख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Khadakwasla To Kharadi Metro Line
शिर्डी विमानळावर अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग; दोन दिवसांत टेंडर

पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत हा निर्णय झाला. २०१८ मध्ये ‘पीएमआरडीए’ने पुणे, पिंपरी चिंचवडसह ‘पीएमआरडीए’ हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लघू, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या. सुमारे ४० हजार कोटींचे प्रकल्प या आराखड्यात सुचविले आहेत. त्यामध्ये मेट्रो, बीआरटी, मोनोरेल, निओ मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांचा समावेश आहे.

याच अहवालातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणाबरोबरच नवीन आठ मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. तसेच ‘पीएमआरडीए’कडून रिंगरोड केला जाणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रस्ते व सेवांचे जाळे निर्माण होणार आहे.

Khadakwasla To Kharadi Metro Line
दशकांची कोंडी फुटणार; शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी पाडापाडी सुरू

का घेतला निर्णय?
- वाहतूक आराखड्याचा दर पाच वर्षांनी आढावा घेऊन त्यात आवश्‍यक ते बदल करणे गरजेचे होते.
- आराखडा तयार केल्यानंतर पुणे शहराची झालेली हद्दवाढ, तेथील वाहतुकीची गरज आणि सद्यःस्थिती यामध्ये बरीच तफावत आहे.
- वाढत्या शहरीकरणासोबत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आवश्‍यक आहे.
- त्यादृष्टीने पुम्टाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
- पुढील पाच वर्षांचा म्हणजे २०२३ ते २०२८ या कालावधीचा सर्वंकष वाहतूक आराखडा ‘पीएमआरडीए’कडून तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Khadakwasla To Kharadi Metro Line
Nashik: 2 रिंगरोडसाठी शिंदे सेनेच्या मंत्री-खासदारांमध्ये स्पर्धा

खडकवासला-खराडी मेट्रो
खडकवासला ते हडपसर-खराडी या मेट्रो मार्गाचा डीपीआर मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावांना जुलैच्या महिन्याच्या मुख्यसभेत मान्यता दिली जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडे तो सादर केला जाईल. ही सर्व प्रक्रिया ‘महामेट्रो’कडून पार पाडली जाणार आहे.

काही महिन्यांपूर्वी महमेट्रोने खडकवासला-हडपसर-खराडी या मार्गाचा सर्वंकष वाहतूक आराखडा (डीपीआर) तयार केला होता. त्याची तपासणी केल्यानंतर स्थायी समितीमध्ये हा आराखडा डीपीआर मान्य करून तो आता मुख्यसभेपुढे आणला आहे. त्याला मान्यता दिली जाईल, असे प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

Khadakwasla To Kharadi Metro Line
UAE सरकारचा नाशिक विमानतळाबाबत महत्त्वाचा निर्णय; आता...

सर्वंकष वाहतूक आराखड्यात दर पाच वर्षांनी अद्ययावत करण्याची तरतूद आहे. हा आराखडा २०१८ मध्ये तयार केलेला आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे शहराची झालेली हद्दवाढ, शहरासह ग्रामीण भागातील वाढलेली लोकसंख्या याचा विचार करता त्यानुसार या आराखड्यात प्रकल्पांची तरतूद करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ‘पुम्टा’च्या बैठकीमध्ये सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करण्यास मान्यता दिली आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com