पुणे (Pune) : गणेशोत्सवात पुणे शहराच्या मध्यवस्तीत वाहनांच्या पार्किंगसाठी शाळा-महाविद्यालयांसह महापालिकेचे आणि खासगी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. वाहतूक शाखा आणि महापालिकेकडून यंदा गतवर्षीच्या तुलनेत पार्किंगची ठिकाणे वाढविण्यात आली आहेत. सुमारे २० शाळा-महाविद्यालयांचे आवार सायंकाळनंतर पार्किंगसाठी खुले होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मध्यवस्तीत होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांनी शाळा-महाविद्यालयांच्या आवारातील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी मंडळांनी केली होती. याबाबत पुणे शहर पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश मिळाले असून, शैक्षणिक संस्थांनीही आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
वाहनतळ - वाहन क्षमता
(मध्यवर्ती पेठा) -
शिवाजी आखाडा वाहनतळ १०० दुचाकी, २० मोटारी
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग ४० दुचाकी
गोगटे प्रशाला ६० दुचाकी
देसाई महाविद्यालय पोलिस वाहनांसाठी पार्किंग
स.प. महाविद्यालय सुमारे १२० दुचाकी
शिवाजी मराठा विद्यालय २५ दुचाकी
नातूबाग १०० दुचाकी
पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ २५ मोटारी
हमालवाडा, पत्र्या मारुतीजवळ ३०० दुचाकी, ५० मोटारी
नदीपात्रालगत ३०० दुचाकी, ८० मोटारी
-------------
(भारती विद्यापीठ) -
पीएमपी टर्मिनल कात्रज ३० दुचाकी, ४० मोटारी
राजीव गांधी प्राणी संग्रहालय ३५० दुचाकी, ७० मोटारी
संतोषनगर, कात्रज भाजी मंडई ३० दुचाकी, ३० मोटारी
------
(सिंहगड रस्ता) -
सणस शाळा, धायरी १२० दुचाकी
राजाराम पूल ते विठ्ठलवाडी कमान चर्चची जागा १०० मोटारी
--------
(दत्तवाडी)-
सारसबाग, पेशवे पार्क १०० दुचाकी
हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक ३० दुचाकी
पाटील प्लाझा पार्किंग १०० दुचाकी
मित्रमंडळ सभागृह ३० दुचाकी
पर्वती ते दांडेकर पूल १०० दुचाकी
दांडेकर पूल ते गणेश मळा ३०० दुचाकी
गणेश मळा ते राजाराम पूल ४०० दुचाकी
नीलायम टॉकीज १०० दुचाकी, ८० मोटारी
----------
(डेक्कन परिसर)-
विमलाबाई गरवारे हायस्कूल १०० दुचाकी
आपटे प्रशाला १०० दुचाकी
आबासाहेब गरवारे महाविद्यालय २०० दुचाकी, मोटारी
फर्ग्युसन महाविद्यालय ५०० दुचाकी आणि मोटारी
मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय १०० दुचाकी
संजीवन वैद्यकीय महाविद्यालय १५० दुचाकी, मोटारी
जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता २०० दुचाकी, मोटारी
------
(शिवाजीनगर)-
सीओईपी महाविद्यालय २५० ते ३०० दुचाकी, मोटारी
एसएसपीएमएस महाविद्यालय २५० दुचाकी
--------
(कोंढवा) -
भक्ती वेदांत पार्किंग ३०० दुचाकी, मोटारी
--------
(हंडेवाडी) -
दादा गुजर शाळा ५०० दुचाकी
जुने इदगाह मैदान, चिंतामणीनगर १००० दुचाकी
भानगिरे शाळा ८०० दुचाकी
-------
(हडपसर) -
बंटर स्कूल १०० दुचाकी, ५० मोटारी
एस.एम. जोशी स्कूल २०० दुचाकी, ५० मोटारी
--------
(मुंढवा)-
पीएमपी बस थांबा, सप्तशृंगी माता मंदिराजवळ ६० दुचाकी
गणेशोत्सवाच्या कालावधीत ही पार्किंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात सायंकाळनंतर पार्किंग उपलब्ध होणार आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांनी नि:शुल्क पार्किंगबाबत सहमती दर्शवली आहे. तर, काही वाहनतळांवर ‘पे ॲण्ड पार्क’ असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उत्सवाच्या कालावधीत मध्यवस्तीत कमीत कमी वाहने आणावीत.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.