Pune: अहो आश्चर्य! 'हा' BRT मार्ग ठरतोय PMPसाठी फायद्याचा; कारण...

BRT Pune
BRT PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुण्यात एकीकडे काही मंडळी 'बीआरटी'ला (BRT) विरोध करीत असली तरी हाच मार्ग पीएमपीसाठी (PMP) संजीवनी ठरत आहे. एकूण उत्पन्नात अर्धा वाटा बीआरटीचा झाला आहे. पूर्वी हे प्रमाण ४० टक्के होते. (Dighi - Alandi BRT)

BRT Pune
Nashik : कोणामुळे रखडला झेडपीच्या 2022-23च्या खर्चाचा ताळमेळ?

दिघी-आळंदी मार्गाचे यात मोठे योगदान आहे. या मार्गावरून रोज सुमारे ८९ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. यातून दिवसाला सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हा मार्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गतिमान बस सेवेसाठी 'बीआरटी' असणे गरजेचे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मिळून एकूण आठ बीआरटी मार्ग आहेत. दिघी -आळंदी मार्ग नुकताच सुरु झाला. त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

BRT Pune
मुंबई आणि उपनगरात 20 हजारांहून अधिक इमारती धोकादायक

बीआरटी का महत्त्वाची?

- पीएमपीच्या रोज सुमारे १६५० बस धावतात.

- प्रत्येक बस किमान २२५ किमी अंतर धावते.

- सर्व बस एक दिवसात तीन लाख ६० हजार किमीचा प्रवास करतात

- सामान्य मार्गावर बसचा सरासरी वेग ताशी १३, तर बीआरटी मार्गावरील धावणाऱ्या बसचा वेग सरासरी ३० किमी

- प्रवाशांच्या वेळेत बचत

- कमी बसच्या संख्येत अतिरिक्त फेऱ्या देणे शक्य

दिघी -आळंदी बीआरटीची उपयुक्तता

एकूण अंतर : ५. ५ किमी

बस थांबे : ९

मार्गावरून धावणाऱ्या बस : २४

बस संख्या : १२६

फेऱ्या : १४५०

प्रवासी संख्या : ८८,८१७

प्रवासी उत्पन्न : १४ लाख ६५ हजार ३८१

बसचा प्रवास : ३० हजार ९८६ किमी

वारंवारता : ५ मिनीट

(एप्रिल २३ ची आकडेवारी)

BRT Pune
Thane : 600 कोटींच्या रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मॅनेज

बीआरटीमधून धावणाऱ्या पीएमपीचा वेग अन्य मार्गांवरील बसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांच्यादृष्टीने बीआरटी सेवा जास्त फायदेशीर आहे. त्याचा विस्तार होणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी बीआरटी महत्त्वाची आहे.

- अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com