Pune: 'या' क्षेत्रात अच्छे दिन! कोणी नोंदविली छप्परफाड कामगिरी?

Fund
FundTendernama
Published on

पुणे (Pune) : गेल्या आर्थिक वर्षात (FY २०२२-२३) राज्यभरात २५ लाख ७६ हजार ५३६ दस्त नोंदणी झाली. त्या आधिच्या आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) तुलनेत दस्त नोंदणीमध्ये १ लाख ९२ हजारांची भर पडली आहे. यावरून बांधकाम क्षेत्रासाठी मागील आर्थिक वर्ष चैतन्य निर्माण करणारे ठरले. तर महसूल सुद्धा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ८ हजार ११८ कोटी जादा मिळाला आहे.

Fund
Good News: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

राज्याला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३२ हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, नोंदणी विभागाकडे ४३ हजार २८९ कोटींचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आठ हजार ११८ कोटी रुपयांचा जादा महसूल मिळाला आहे.

सरकारने अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आहे. रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो प्रकल्प आदींबरोबर विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्‍यक असतो. त्यासाठी सरकार प्रत्येक विभागाला महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देते. या उद्दिष्टांच्या पूर्ती करून त्यापेक्षा अधिक महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मिळविला आहे.

Fund
Nagpur : ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याने वाहतूक कोंडी; कधी होणार काम?

जमिनी खरेदी-विक्रीला चांगले दिवस
मुंबई, पुण्यापाठोपाठ राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार गेल्या वर्षभरात झाले असल्याचे दिसून आले. जगात आर्थिक मंदीचे वारे वाहत असतानाही राज्यात मात्र बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस असल्याचे यावरून स्पष्ट होतो.

आर्थिक वर्ष - दस्त नोंदणीतून प्राप्त महसूल (आकडे कोटीमध्ये)
२०१४-१५ - १९ हजार ९५९
२०१५-१६ - २१ हजार ७६७
२०१६-१७ - २१ हजार ५२
२०१७-१८ - २६ हजार ४९४
२०१८-१९ - २८ हजार ४०४
२०२०-२१ - २५ हजार ६५१
२०२१-२२ - ३५ हजार १७१
२०२२-२३ - ४३ हजार २८९

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com