Pune : अखेर 'ती' बातमी आली! पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रवासाचा मुहूर्त ठरला?

Pune Metro : पुणे-पिंपरी मेट्रो चाचणी यशस्वी; स्वारगेटपर्यंत प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता
Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या ३. ६४ किलोमीटर अंतरावर भुयारी मेट्रोची चाचणी सोमवारी यशस्वी झाली. मुठा नदीच्या पात्राखालून सुमारे १३ मीटरवरून पहिल्यांदाच मेट्रो धावली. सुमारे दोन महिन्यांनी शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Pune Metro
Dada Bhuse : दादा भुसेंनी आयोजित केलेली 'ती' बैठकच करावी लागली रद्द; नेमके काय झालं?

वनाज- रामवाडी (१६ किलोमीटर) आणि पिंपरी चिंचवड- स्वारगेट (१७ किलोमीटर) या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित मार्गाची कामे वेगात सुरू आहेत. पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावर मेट्रो सध्या पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान धावत आहे.

या मार्गावर शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भूमिगत मेट्रोची चाचणी पहिल्यांदा झाली. ही चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरू झाली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ११ वा. ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानकात पोचली. या चाचणीसाठी सुमारे १ तास लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किलोमीटर होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टांनुसार झाली, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Pune Metro
Amravati : 32 कोटीत शाळा, अंगणवाडी, रस्ते आणि तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट

स्थानके

- शिवाजीनगर न्यायालय - जमिनीपासून ३३ मीटर खोल

- बुधवार पेठ स्थानक - ३० मीटर खोल

- महात्मा फुले मंडई स्थानक - २६ मीटर खोल

- स्वारगेट स्थानक - २९ मीटर खोल आहे.

Pune Metro
Vijay Wadettiwar : ॲम्ब्युलन्स घोटाळ्यानंतर आता 250 कोटींचा साडी - मोबाईल घोटाळा

भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी मुठा, मुळा आणि पवना या ३ टनेल बोअरींग मशीनचा (टीबीएम) वापर करण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे काम २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरु करण्यात आले आणि प्रत्येकी ६ किलोमीटर अंतराच्या दोन भुयारी मेट्रोचे खोदकाम काम ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले.

भूमिगत मेट्रोमुळे दोन महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे. पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेट गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम आदी ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.

Pune Metro
Gondia : निधी खर्चात ग्रामपंचायतींची 'लेटलतीफी'; 175 कोटी आहेत पडून

शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाची चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे येत्या २ महिन्यांत पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा थेट प्रवास शक्य होईल. रुबी हॉल क्लीनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाश्यांसाठी सुरू होऊ शकेल.

- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com