Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम राहणार; कारण...

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोचा टप्पा मार्च २०२५ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हिंजवडी येथील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय व्हावी, येथील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी या मेट्रो मार्गिकेचा पर्याय ठेवण्यात आला.

या मार्गिकेमुळे पुणे शहरातील औंध, बाणेर, बालेवाडी येथून दररोज हिंजवडीला कामासाठी येणाऱ्या आयटीयन्सला फायदा होणार असला तरी पिंपरी चिंचवडमधील आयटी कर्मचाऱ्यांना मात्र या मेट्रोमार्गाचा वापर करता येणार नाही. त्यामुळे शिवाजीनगर-हिंजवडी ही मार्गिका शहराजवळ होऊनही शहरातील बहुतांश आयटीयन्सना त्याचा फायदा होणार नसल्याची बाब पुढे आली आहे.

Pune Metro
नाशिक होणार वेअरहाउस हब; महिंद्रा लॉजिस्टिकची 500 कोटींची गुंतवणूक

हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे शेकडो आयटी कंपन्या तसेच औद्योगिक आस्थापना आहेत. तिथे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची खासगी वाहने, कंपन्यांच्या बस व कार यांच्या दररोजच्या वाहतुकीमुळे हिंजवडी व परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्‍न हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे होऊ घातलेला मेट्रो प्रकल्प या दररोजच्या वाहतूक कोंडीवर उत्तम तोडगा असेल, अशी अपेक्षा रोज प्रवास करणाऱ्यांना होती. मात्र ही मेट्रो मार्गिका केवळ बालेवाडी, बाणेर, शिवाजीनगर याच भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, निगडी, वाकड, चिंचवड, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख या भागातही आयटीयन्स मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यांना मात्र या मेट्रो मार्गिकेचा फायदा होणार नसल्याने ही मार्गिका सुरू झाल्यावरही त्यांना खासगी अथवा कंपनीच्या वाहनानेच कार्यालयात यावे लागणार आहे.

Pune Metro
CIDCO : सिडकोचा डबलधमाका; 3322 सदनिकांच्या सोडतीची घोषणा; किंमतही 6 लाखांनी कमी

भविष्यात मेट्रो मार्गिकेची आखणी व्हावी

हिंजवडीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ४५ ते ५० टक्के कर्मचारी पिंपरी चिंचवड मध्ये राहतात. यातील बहुतांश कर्मचारी पिंपळे सौदागर, वाकड व पिंपळे निलख या भागात राहतात. आयटीयन्स आपल्या वाहनांनी कामावर येणे अधिक पसंत करतात. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतरही हिंजवडी व परिसरातील वाहतुकीची समस्या ही कितपत सुटेल याबाबत शंका निर्माण केली जात आहे.

येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न पूर्णपणे सोडविण्यासाठी कर्मचारी नक्की कुठे राहतात, रहदारी कोणत्या मार्गावर जास्त असते, याबाबत सर्वेक्षण होऊन भविष्यात मेट्रो मार्गिकेची आखणी व्हावी, असाही मतप्रवाह आयटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

Pune Metro
Good News : कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला; 84 टक्के काम पूर्ण

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका

अंतर ः २३. ३ किलोमीटर

मेट्रो स्थानके ः २३

महत्त्वाची स्थानके ः माण, शिवाजी चौक, वाकड चौक, बालेवाडी हायस्ट्रिट, विद्यापीठ चौक, शिवाजीनगर

मेट्रो सुरू झाल्यावर काय करावे

- आयटी कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळेनुसार मेट्रोच्या वेळा ठरविणे

- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांच्या वर्दळीच्या वेळांचे सर्वेक्षण करणे

- मेट्रो स्टेशनपासून कंपनीपर्यंत बस, रिक्षा सेवा सुरू करणे

- कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो स्थानकापर्यंत ‘पिक अप-ड्रॉप’ सेवा ठेवणे

Pune Metro
Devendra Fadnavis : उद्योजकांसाठी गुड न्यूज; सवलतीचा वीजपुरवठा 'पॅटर्न' आणणार

कोरोनामुळे अनेक दिवस घरून काम होते. आता मात्र हायब्रीड पद्धतीमुळे दोन दिवस कार्यालयात जावे लागत आहे. मी पिंपरी चिंचवड शहरातून हिंजवडी कार्यालयापर्यंत दुचाकीने प्रवास करतो. प्रवासासाठी रोज ३० मिनीट ते १ तासापर्यंतचा कालावधी लागतो. मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा काहीही फायदा नाही.

- कपिल कपूर, आयटी कर्मचारी, ई झेस्ट कंपनी, हिंजवडी आयटी पार्क

पुण्यातून जितके कर्मचारी हिंजवडी येथे कामानिमित्त येतात, तितकीच संख्या पिंपरी चिंचवडमधील विविध भागांतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही आहे. त्यासाठी हिंजवडी ते पिंपरी चिंचवड हा मार्ग व्हावा, अशी आमची मागणी आहे. सध्या होणाऱ्या मार्गिकेवरील मेट्रोच्या वेळा ठरविताना आयटीयन्सच्या कामाचा विचार करणे आवश्‍यक आहे. या प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी केली तरच मेट्रोची प्रवासी संख्या वाढून येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

- हरप्रित सलुजा, नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट, हिंजवडी आयटी पार्क

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com