Pune: जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात 150 कोटींची वाढ

Pune ZP
Pune ZPTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात (Pune District Development Plan) १५० कोटींच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. या निधीवाढीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी गावनिहाय विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच व उपसरसरपंचासोबत तालुकानिहाय आढावा बैठका आयोजित करणार आहेत. यानुसार येत्या १ एप्रिलपासून या बैठका घेण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवारी (ता. २८) केली.

Pune ZP
Nagpur: पेट्रोल-डिझेलची वाहने कधी बंद होणार? गडकरी म्हणाले...

पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, ‘‘ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. गावांच्या उन्नतीसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्यासोबतच गावातील शेती, जोडधंदे वाढले पाहिजेत. महिला व मुलांसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.’’

Pune ZP
Good News! वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सुटण्याची वेळ बदलली?

प्रास्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘जिल्ह्यात शेती उत्पादन वाढले आहे. भूजल पातळीतही वाढ झाली आहे. कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे. लंपी रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने फिरते दवाखाने चालवून चांगले काम केले आहे.

Pune ZP
Nagpur: C-20च्या नावानं चांगभलं! 40 कोटींची हिरवळ पाण्यात?

या समारंभात सन २०२० -२१ व २०२१-२२ या दोन वर्षांचे कृषी ग्राम व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस पुरस्कार, सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरस्कार आणि सन २०२१-२२ चे आदर्श गोपालक पुरस्कार, उत्कृष्ट पशुवैद्यकीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com