Pune : छोट्या कामांचे एकत्रीकरण नको; एकच मोठे टेंडर काढणे बंद करा!

Collector Pune
Collector PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : राज्य कंत्राटदार महासंघ व पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

Collector Pune
Tendernama Impact : 'वैद्यकीय शिक्षण'चा सुल्तानी निर्णय रद्द! 5 पट पठाणी शुल्क वसुलीचा वादग्रस्त निर्णय मागे

शासनाने आर्थिक तरतूद पूर्ण केल्याशिवाय टेंडर्स काढू नयेत अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन राज्य कंत्राटदार महासंघाचे सुरेश कडू व पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

Collector Pune
Pune : धक्कदायक निरीक्षणे नोंदवीत 'या' गृहरचना संस्थेची नोंदणीच केली रद्द

काय आहेत मागण्या?

- राज्यातील विविध विभागांत झालेल्या विकास कामांच्या देयकांची ४० हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीने मिळावी

- राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे

- विकास कामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा

- शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठे टेंडर काढणे तातडीने बंद करावे

- सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास या खात्यांमधील कामांचे वाटप अभियंत्यांना नियमांनुसार करावे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com