Pune : चाकण - तळेगाव मार्गावरील कोंडी फुटेना; पोलिसांची दमछाक, 5 वर्षांपासून...

Traffic
Traffic Tendernama
Published on

पुणे (Pune) : लाखो रुपये खर्च करून तळेगाव दाभाडेतील (Talegaon Dabhade) चौकाचौकांत बसविलेले वाहतूक नियंत्रक दिवे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडले आहेत. त्यामुळे, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियंत्रक दिवे व सीसीटीव्ही चालू करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद तसेच पोलिस प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Traffic
PCMC : 'बहिणाबाई'साठी आता 24 कोटींचे टेंडर; आणखी वर्षभर...

तळेगाव - चाकण मार्गावरील दररोज होणारी वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, या हेतूने साडेचार वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे नगरपालिकेतर्फे स्टेशन चौक, सिंडिकेट बँक, जुने टपाल कार्यालय, जुनी भाजी मंडई, मराठा क्रांती चौक, आयडीबीआय बँक, नवीन भाजी मंडई अशा सात ठिकाणी एकाच खांबावर वाहतूक नियंत्रक दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

पादचाऱ्यांना चालणे कठीण

तळेगाव-चाकण महामार्गावर दररोज अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांना धोकादायक पद्धतीने चालावे लागते. त्यामुळे, अपघातांत अनेकांचा बळी गेला आहे. वाहतूक नियंत्रक दिवे बंद अवस्थेत असल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. तसेच वाहतूक कोंडी सुरळीत करताना पोलिसांची दमछाक होत आहे.

Traffic
Sambhajinagar : मंत्र्यांसाठी जालना रोड सुसाट; मग 'या' सर्व्हिस रस्त्याला वाली कोण?

तब्बल १० लाखांचा खर्च

तळेगाव-चाकण रस्ता तसेच अन्य ठिकाणी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये १० लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हे सीसीटीव्ही कॅमेरे साधारणतः वर्षभर कार्यान्वित होते. त्यानंतर, नगर परिषदेने देखभालीसाठी ठेकेदार न नेमल्याने कॅमेरे बंद पडले. परिसरात अपघात किंवा काही गुन्हेगारी घटना घडल्यास पोलिसांना तपासासाठी व्यावसायिकांच्या खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

Traffic
अखेर सातारा-देवळाईकरांना मिळाला न्याय; 'या' मुख्य रस्त्याचा पालटणार नूर

वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि पोलिसांना तपासात मदत व्हावी यादृष्टीने सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रक दिवे चालू असणे गरजेचे आहेत. गेल्या तीन वर्षांत नगर परिषदेने याबाबत काही उपाय-योजना केलेली नाही. सर्व कॅमेरे व वाहतूक नियंत्रक दिवे पूर्ववत सुरू करावेत.

- दिलीप डोळस, सामाजिक कार्यकर्ते

वाहतूक नियंत्रक दिवे व सीसीटीव्ही चालू करण्यासाठी नगर परिषदेबरोबर दोन वेळा पत्रव्यवहार केला आहे.

- विशाल गजरमल, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्तीबाबत टेंडर काढण्यात आले असून या कामाला लवकरच सुरवात करण्यात येईल.

- ममता राठोड, उपमुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com