Pune City News : धक्कादायक! पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांचे 'या' बाबीकडे होतेय दुर्लक्ष

Pune City
Pune CityTendernama
Published on

Pune City News पुणे : शहरातील बहुतांश जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशामक यंत्रणा नाही. नव्या गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंट आणि कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये ही यंत्रणा बसवली आहे. परंतु ही यंत्रणा कार्यान्वित आहे का, त्याची तपासणी किंवा ‘फायर ऑडिट’ करून घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.

Pune City
Akola : 200 कोटींची जमीन गिळंकृत करण्याचा डाव? टेंडरमध्ये सुद्धा केला घोळ

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये किंवा सदनिकेत अचानक आग लागली तर सोसायटीत अग्निशामक यंत्रणा कार्यरत आहे का? असल्यास ती सुस्थितीत आहे याची खात्री केली आहे का? शिवाय ती यंत्रणा सुरू करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे का?, या प्रश्नांचे उत्तर होय असेल तर आपण सुरक्षित आहात. परंतु बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांकडून ‘फायर ऑडिट’कडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमानाचा पारा वाढल्याने अचानक कधीही आगीची घटना घडू शकते. दोन दिवसांपूर्वी सदाशिव पेठेतील एका सदनिकेत आगीची घटना घडली. शिवाय काही दिवसांपूर्वी येरवड्यातील फिनिक्स मॉल आणि औंधमधील वेस्टर्न मॉलमध्ये आगीची घटना घडली. या मॉलमध्ये आग नियंत्रण यंत्रणा सुस्थितीत होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Pune City
Nashik ZP : पंधरापैकी केवळ 6 बीडीओंना नवी वाहने; 9 जणांचा कालबाह्य खटार वाहनांमधून प्रवास कधी थांबणार?

अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘२००६ नंतरच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी बिल्डरला अग्निशामक यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. इमारतीचे किंवा कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यापूर्वी त्याबाबत अग्निशामक दलाकडून परवाना घेतला जातो. सोसायटी अस्तित्वात आल्यास त्याची देखभाल आणि दर सहा महिन्याला ‘फायर ऑडिट’ करून घेणे आवश्यक आहे. बिल्डरने ही यंत्रणा बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांची आहे’’.

Pune City
Nagpur : उमरेड मार्गावर साडेबारा एकरात 85 कोटी खर्चून साकारतोय 'हा' प्रकल्प

पुणे शहरातील आगीच्या घटना...
मार्च २०२४
- इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट - ५८
- गॅस सिलिंडरमुळे - ५

१५ एप्रिल २०२४ पर्यंत
इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट - ४२
गॅस सिलिंडरमुळे - ३

Pune City
Nashik ZP : पंधरापैकी केवळ 6 बीडीओंना नवी वाहने; 9 जणांचा कालबाह्य खटार वाहनांमधून प्रवास कधी थांबणार?

गृहनिर्माण सोसायट्यांकडून ‘फायर ऑडिट’ करून घेण्याबाबत बऱ्याचदा दुर्लक्ष होते. अशा वेळी सभासदांनी ही बाब निदर्शनास आणून द्यावी. सुरक्षिततेवर खर्च करणे बऱ्याचदा नाहक खर्च समजला जातो. परंतु अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत आहे का, हे दर सहा महिन्यांनी तपासून अग्निशामक दलास कळविणे आवश्यक आहे.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आगीची घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घ्यावी. आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा पाण्याचा साठा आहे का, ‘डिस्टिंगविशर’ची मुदत आणि अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित आहे का, याची वेळोवेळी खातरजमा करावी. व्यवस्थापक, सुरक्षा रक्षक आणि सभासदांनाही आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण द्यावे.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण आणि अपार्टमेंट संस्था

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com