Pune: मोठी बातमी; मांजरी परिसराचा लवकरच बदलणार चेहरामोहरा, कारण...

PMRDA TP Scheme
PMRDA TP SchemeTendernama
Published on

पुणे (Pune) : म्हाळुंगे-माण, औताडे-हंडेवाडी पाठोपाठ मांजरी खुर्द-कोलवडी (Manjri Khurd-Kolavadi) येथील २३३ हेक्टरवरील नगररचना योजना (TP Scheme) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन योजना राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

PMRDA TP Scheme
MSRDC : पुणे-औरंगाबाद, पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडॉरचा प्रश्न सुटणार?

प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच २५० हेक्टरवरील म्हाळुंगे-माण नगररचना योजनेचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने आणि मध्यंतरी कोरोनामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला होता. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचे काम ‘पीएमआरडीए’ने स्व-स्तरावर सुरू केले आहे. असे असताना आता औताडे-हंडेवाडी येथील ९४ हेक्टरवरील आणि त्यापाठोपाठ वडाची वाडी येथील १३४ हेक्टरवरील नगररचना योजनेची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविल्या आहेत.

आता मांजरी खुर्द-कोलवडी येथील २३३ हेक्टरवरील नगररचना योजना राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार नगररचना योजनांना दोन महिन्यांत मान्यता देण्याचे बंधन आहे. त्यामुळे या योजनेस मार्च अखेरपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर जवळपास सातशे हेक्टर जमिनींवरील योजनेची अंमलबजावणी करणे ‘पीएमआरडीए’ला शक्य होणार आहे.

PMRDA TP Scheme
Railway : पुणे-नाशिक अवघ्या दोन तासांत; प्रकल्पातील मोठा अडथळा दूर

मांजरी बुद्रुक येथील २३३.३५ हेक्टरवर ही योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेत एक हजार ५०० खातेदारांना १७७ प्लॉटचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे नुकतीच पाठविल्याचे ‘पीएमआरडीए’ने सांगितले. तर होळकरवाडी एक व दोन या दोन्ही योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दहा दिवसांत या दोन्ही योजनाही राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत.

‘पीएमआरडीए’ने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नगर रचना योजना प्रस्तावित केल्या आहेत. तर प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्यासाठी यापूर्वीच ११ योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यात म्हाळुंगे-माण, औताडे-हंडेवाडी व मांजरी खुर्द-कोलवडी या योजनांचा समावेश आहे. या योजनेची कामे सुरू असतानाच ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील ३४ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली. त्यामुळे या गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या चार ते पाच योजना महापालिकेच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यापैकी एका योजनेला महापालिकेने नुकतीच मान्यता दिली. तर दुसरी योजना अंतिम मान्यतेच्या टप्प्यात आहे.

PMRDA TP Scheme
Nagpur ZP : जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांवर लवकरच भरती

याशिवाय ‘पीएमआरडीए’च्या प्रारूप विकास आराखड्यात ग्रोथ सेंटर प्रस्तावित केले आहे. या सेंटरच्या परिसरात या २७ टीपी स्कीम प्रस्तावित केल्या आहेत. आराखड्यावरील हरकती-सूचनांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. मार्च अखेरपर्यंत हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे.

रिंगरोडसाठी सुमारे ३० एकर जागा
औताडे-हंडेवाडी नगररचना योजनेतून ‘पीएमआरडीए’ने हाती घेतलेल्या रिंगरोडसाठी ९.८३ म्हणजे जवळपास दहा हेक्टरपर्यंतची जागा ताब्यात येणार आहे, तर मांजरी खुर्द-कोलवडी योजनेतून १.७३ हेक्टर जागा रिंगरोडसाठी ताब्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे बारा हेक्टर म्हणजे सुमारे ३० एकर जागा विनामोबदला रिंगरोडसाठी उपलब्ध होणार आहे.

PMRDA TP Scheme
Railway : कल्याण-मुरबाड रेल्वेला ग्रीन सिग्नल; 1000 कोटींचे टेंडर

१३० हेक्टरवर प्रस्तावित केलेल्या औताडे-हंडेवाडी पाठोपाठ मांजरी खुर्द-कोलवडी येथील २३३ हेक्टरवरील नगररचना योजना राज्य सरकारकडे सादर केली आहे. म्हाळुंगे-माणनंतर ही सर्वांत मोठी योजना आहे. लवकरच आणखी दोन योजना राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
- रामदास जगताप, नगररचना योजना समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com