Pune Airport : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पाहताच ज्योतिरादित्य शिंदेंचा का चढला पारा?

Jyotiraditya Scindia
Jyotiraditya ScindiaTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे (Pune Airport New Terminal) काम पूर्ण झाले असून, काही कामांबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ही कामे झाल्यानंतर आढावा घेतला जाईल. येत्या दोन ते तीन आठवड्यांत उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी दिली. टर्मिनलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हावे म्हणून प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

Jyotiraditya Scindia
Nashik : येवल्यासाठी छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज! 'या' कामांसाठी तब्बल 10 कोटींचा...

शिंदे यांनी शुक्रवारी नव्या टर्मिनलच्या मुख्य इमारतीचा पाहणी केली. इमारतीच्या बाहेरील परिसरात फिरून त्यांनी कामांचा आढावा घेतला. या वेळी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिंदे यांच्या सूचना

नागपूरहून पुणे विमानतळावर दाखल होताच शिंदे नव्या टर्मिनलच्या इमारतीत दाखल झाले. तेथे लावण्यात आलेले सायनेज बोर्ड ठीक नसल्याचे त्यांना आढळून आले. तसेच काही छायाचित्रांच्या फ्रेम खराब झाल्याचे निदर्शनास आले.

त्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ‘ताबडतोब याची दुरुस्ती करा. स्वच्छता ठेवा. येत्या दोन-तीन दिवसांत सुचविलेल्या बदलांची अंमलबजावणी झाली पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

Jyotiraditya Scindia
Nashik : जल जीवनच्या योजनांसाठी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय; आता ग्रामपंचायतींचे वीजपंपांचे देयक...

नव्या टर्मिनलचे फायदे

- सध्याच्या टर्मिनल मधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग

- दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूक होते

- नव्या टर्मिनलवरून रोज १२० विमानांचे उड्डाण आणि लँडिंगची क्षमता

- दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांच्या वाहतुकीचा अंदाज

असे आहे नवे टर्मिनल

- चेक इन काऊंटर : ३४

- गेट : ६ (आगमन व निर्गमन)

- बॅगेज बेल्ट : ५

- एरोब्रिज : ५

- पहिला मजला : सेक्युरिटी होल्ड एरिया

- बोर्डिंग ब्रिज : ५

- क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस फूट

- प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख

- एकूण खर्च : ४७५ कोटी

- तासाला : २३०० प्रवाशांची क्षमता.

- कनेक्टिव्हिटी : ३७ शहरे

Jyotiraditya Scindia
Nashik : सिंहस्थासाठी 500 एकर जागा अन् सिंहस्थ परिक्रमेसाठी निधी द्या!

प्रवाशांना मिळणार या सुविधा

- प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर

- प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही, तसेच या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅग बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल

- प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कमर्शिअल लाउंजचादेखील समावेश आहे

- कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर

- लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

- रेस्टॉरंट

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com