Pune : अपघात वाढले; रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

Pune : अपघात वाढले; रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे
Published on

पुणे (Pune) : कासार आंबोली (ता. मुळशी) येथील पुणे-कोलाड रस्त्यावर शिंदेवाडी येथील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून, जखमींचे प्रमाणही वाढले आहे. हा खड्डा व लगतचा चर बांधकाम विभागाने तातडीने बुजवावा, अशी मागणी सरपंच सुवर्णा मारणे यांनी केली आहे.

Pune : अपघात वाढले; रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे
Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांनी 30 टक्क्यांची मर्यादा ओलांडून केली टेंडरची खैरात

पुणे-कोलाड या महामार्गावरून कोकणाकडे जाताना शिंदेवाडी येथील पुलालगतच हा खड्डा आहे. सुमारे चार ते पाच फूट लांबीच्या या खड्ड्याशेजारीच सिमेंटच्या रस्त्याचा उंबरा असून, तेथेही खड्डा आहे. या खड्ड्यांतून वाहने जाताना वारंवार आदळतात आणि अपघात होतात. दुचाकी वाहने वारंवार धडकून पडल्याने अपघात होऊन चालक जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. मोपेड दुचाकी या खड्ड्यांत थेट अडकून पडत आहेत.

Pune : अपघात वाढले; रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे
Mumbai : राज्यातील 3 लाख कंत्राटदार का झाले आक्रमक?

त्यामुळे महिला दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मोठी अवजड वाहने वगळता अन्य सर्वच चारचाकी वाहने या खड्डयात आदळत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. मुळशीहून पुण्याकडे जाताना नव्यांगण या गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशाच्या रस्त्यासमोरील हा खड्डा म्हणजे अपघाताचा हॉटस्पॉट झाला आहे.

पुण्याकडे जाताना या खड्ड्याच्या पश्चिम बाजूला कोलाड रस्त्याला तीव्र उतार आहे. त्यामुळे पुण्याला जाताना वाहनांचा वेग जास्त असतो. हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने वाहने आदळली जात आहेत. हा खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com