Pune: विद्यापीठ चौकातील भविष्यातील कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय..

Flyover
FlyoverTendernama
Published on

पुणे (Pune) : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋर्षी चौक) सुमारे ५५ मीटर लांबीचा स्पॅन (गर्डर) टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चौकात उड्डाणपुलाचे खांब येणार नाहीत. त्यादृष्टीने या स्पॅन तयार करण्याचे काम कंत्राटदार कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे.

Flyover
Nagpur : विद्युत केबलमुळे रखडले रस्त्याचे काम

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून तेथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना यापूर्वी झालेल्या ‘पुमटा’च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या.

मात्र, विद्यापीठ चौकातील जलवाहिनी हलविण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू केल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे या चौकातील काम सुरू झाले नव्हते.

Flyover
Bullet Train: 21 किमीच्या आव्हानात्मक बोगद्याचे टेंडर 'या' कंपनीला

अखेर कामाला मुहूर्त
- विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुमटा’ची बैठक झाली.
- या बैठकीत महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारात तातडीने परवानगी देण्याचे आदेश राव यांनी दिले होते.
- तसेच विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी देण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
- पुलाचे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक ते तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वापरून काम सुरू करावे, अशा सूचना ‘पीएमआरडीए’ला दिल्या.
- परंतु मध्यंतरी ‘जी २०’ परिषदेमुळे हे काम पुन्हा लांबणीवर पडले होते. अखेर या कामाला मुहूर्त लागला.
- विद्यापीठ चौकात पुलाच्या कामासाठी चौक आणि रस्त्यालगत बॅरिकेडिंग करून कामे सुरू करण्यात आले आहे.

असे होणार काम...
- गणेशखिंड रस्त्यावर ज्या ठिकाणी पूल सुरू होणार आहे, त्या ई स्केवर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतणार आहे.
- त्या ठिकाणच्या पिलर्सचे काम यापूर्वी ‘पीएमआरडीए’ने हाती घेतलेले काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे.
- मुख्य चौकात काम उड्डाणपुलाचा खांब (पिलर्स) असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो.
- त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये ५५ मीटरचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- त्या ठिकाणी लोखंडी गर्डरच्या स्पॅन टाकण्यात येणार आहे.
- मेट्रोच्या दोन खांबांमधील अंतर हे ३८ मीटरचे आहे. परंतु चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवण्यात येणार आहे.
- परिणामी चौकात खांब उभारण्याची गरज राहणार नाही.
- त्यामुळे ५५ मीटर लांबीचा आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचा हा स्पॅन असणार आहे.
- त्यावरून वाहतूक करणे सहज शक्य होणार आहे

Flyover
Pune: दोन सदनिका असलेल्या पुणेकरांसाठी गुड न्यूज...

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विद्यापीठ चौकात खांब न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खांबांमधील अंतर हे ५५ मीटर लांब ठेवण्यात येणार असून तशा पद्धतीने दुमजली उड्डाणपुलाचे डिझाइन करण्यात आले आहे.
- विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com