पुणे (Pune) : रेल्वे प्रशासन पुण्याहून जोधपूर व दाहर का बालाजी या ठिकाणी विशेष रेल्वेची सेवा सुरू करीत आहे. दाहर का बालाजी ही रेल्वे जयपूर स्थानकावरून धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे-जोधपूर-पुणे साप्ताहिक :
- पुणे-जोधपूर रेल्वे २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी पुण्याहून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. जोधपूरला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.
- जोधपूर-पुणे २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दर मंगळवारी जोधपूरहून रात्री १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
थांबा दिलेली स्थानके
लोणावळा, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सूरत, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, मेहसाणा, अबू रोड, फालना, मारवाड जंक्शन
पुणे-दाहर का बालाजी साप्ताहिक विशेष रेल्वे :
पुणे-दहर का बालाजी साप्ताहिक विशेष रेल्वे ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी पुण्याहून सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी दाहर का बालाजी येथे पोहोचेल.
- दाहर का बालाजी-पुणे साप्ताहिक रेल्वे ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी दाहर का बालाजी येथून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
थांबा दिलेली स्थानके
लोणावळा, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सूरत, अंकलेश्वर, वडोदरा, रतलाम, नागदा, कोटा, सवाई माधवपूर, दुर्गापूर और जयपूर आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.