‘PMRDA’ प्रथमच विकसकाला देणार ‘क्रेडीट नोट'

PMRDA
PMRDATendernama
Published on

पुणे (Pune) : खराडी ते मांजरी खुर्द या दरम्यानचा सुमारे २.३ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानचा ७.७ किलोमीटर लांबीचा विकास आराखड्यातील रस्ता खासगी भागीदारी तत्वावर (PPP) विकसित करण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) घेतला आहे. त्यांच्या मोबदल्यात विकसकाला ‘पीएमआरडीए’कडून रोख मोबदल्याऐवजी ‘क्रेडीट नोट’च्या (विकसन शुल्कात सवलत) स्वरूपात मोबदला देण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर प्रथमच अशा प्रकारे रस्ता विकसन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

PMRDA
महाविकास आघाडीचा कोळशासाठी 'काखेत कळसा अन् गावाला...'; आळस नडला

पीएमआरडीएकडून प्रारूप विकास आराखड्यात खराडी ते मांजरी खुर्द हा ३० मीटर रूदींचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. हा रस्ता पीपीपी तत्वावर विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून ऑनलाइन टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी अंदाजे ९ कोटी २७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ३० मीटर रुंदीच्या रस्त्यापैकी १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम विकसकाने स्वखर्चातून करून द्यावयाचा आहे तर उर्वरित १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम हे ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठीची शंभर टक्के जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आल्याने टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

PMRDA
'मिठी'चा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी १६०० कोटींचा ऍक्शन प्लान

मांजरीकरांची वेळेत बचत होणार
मांजरी खुर्द येथील नागरीकांना पुण्यात अथवा खराडीला जाण्यासाठी सध्या सोलापूर रस्त्याने हडपसरला यावे लागते. त्यामुळे हे अंतर लांब पडते. हा रस्ता विकसित झाल्यानंतर मांजरी खुर्दवरून दहा मिनिटात खराडीला येता येणार आहे. खराडीवरून पुण्यात येणे सोयीचे ठरणार आहे. या रस्त्यामुळे मांजरी खुर्दमधील रहिवाशांच्या वेळेत जवळपास अर्धा तासांनी बचत होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.

PMRDA
स्वच्छतागृहे कागदावरच अन् जाहिरातीचा धंदा मात्र जोरात

वाहनांची संख्या कमी होणार
वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानच्या ७.७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे नाशिक आणि नगरकडे जाणारी वाहने परस्पर जाणार आहेत. सध्या या वाहनांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करून जावे लागते. हा रस्ता विकसित झाल्यानंतर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडमध्ये देखील या रस्त्याचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड मधील स्पाईन रोडच्या पुढील टप्पा म्हणजे हा रस्ता आहे. चऱ्होलीपासून वडगाव शिंदे-लोहगावमार्गे वाघोलीपर्यंत हा रस्ता जाणार आहे. यामुळे नगरवरून नाशिकला जाणाऱ्या आणि नाशिकवरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना थेट जाता येणार आहे.

PMRDA
टेंडरनामा इम्पॅक्ट;निकृष्ट दुभाजकाच्या बांधकामावर अधिकाऱ्यांचे पथक

पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात मांजरी खराडी ते मांजरी खुर्द दरम्यानचा रस्ता विकसित करण्याचे काम पीपीपीवर हाती घेण्यात आले आहे. त्यांचे ऑनलाइन टेंडरही काढण्यात आले आहेत. त्यानंतर वडगावशिंदे ते वाघोली दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांमुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
- डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

PMRDA
वादग्रस्त ‘नानक कंस्ट्रक्शन'ची सुनावणी पुढे ढकलली

नव्याने होणाऱ्या खराडी-मांजरी खुर्द रस्त्यामुळे परिसरातील दळणवळणाला मोठी गती मिळेल. रोजगार, उद्योगांना चालना मिळून गावातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांपासून आम्ही या निर्णयाची वाट पाहत होतो. शैक्षणिकदृष्ट्याही त्यामुळे प्रगती होणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असल्याने येत्या काही वर्षांत रस्त्यामुळे झपाट्याने विकास होईल.
- किशोर उंद्रे, माजी उपसरपंच, मांजरी खुर्द

PMRDA
गडकरींनी लोकार्पण केलेल्या जालना रोडवर खड्डेच खड्डे

खराडी-मांजरी खुर्द रस्त्यामुळे मुख्य म्हणजे सात-आठ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. परिसराच्या विकासात या रस्त्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागाला जोड मिळणार असल्याने व्यवसाय धंद्यांना पूरक वातावरण निर्माण होईल.
सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांना नियोजनपूर्वक विकास करता येईल. चांगल्या पद्धतीने विकसित होणारे तालुक्यातील पहिले गाव असेल.
- स्वप्नील उंद्रे, सदस्य, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com