म्हाळुंगे-माणच्या धर्तीवर 'पीएमआरडीए'कडे टीपी स्कीमचे सात प्रस्ताव

PMRDA
PMRDATendernama
Published on

पुणे (Pune) : म्हाळुंगे माण नगररचना योजनेच्या (टीपी स्कीम) धर्तीवर महापालिका, नगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) परिसरात १०० एकर किंवा त्यापेक्षा अधिक जागेवर नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यास मान्यता देण्याचे सात प्रस्ताव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल झाले आहे. त्यास मान्यता देण्याची प्रक्रिया पीएमआरडीएकडून पुन्हा सुरू केली आहे.

PMRDA
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; पाहणीसाठी खुद्द रेल्वेमंत्री 'बीकेसी'त

पीएमआरडीएकडून प्रारूप विकास आराखड्यात २७ टीपी स्कीम प्रस्तावित केल्या आहेत. या सोडून खासगी जागा मालकांनी पुढे येऊन टीपी स्कीम राबवाव्यात, या हेतूने २०१९ मध्ये प्रस्ताव मागविले होते. एकूण १२ गटांकडून पीएमआरडीएकडे प्रस्ताव झाले होते. पीएमआरडीएने दाखल झालेल्या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर त्यापैकी पाच ठिकाणी ही योजना राबविणे शक्य नसल्याचे समोर आले होते. उर्वरित सात ठिकाणी ही योजना राबविणे शक्य असल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान कोरोनामुळे दोन वर्ष कोणतेही काम झाले नाही. आता पुन्हा त्यास सात प्रस्तावांची तपासणी पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आली आहे. या योजना राबविण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून नव्याने सहमतीपत्र पीएमआरडीएकडून मागविण्यात आले आहे. प्राप्त झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

PMRDA
पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी खड्ड्यांबाबत सतत माहिती मागूनही

काय अटी होत्या
- या योजनेसाठी किमान १०० एकर किंवा त्यापेक्षा अधिक जागा हवी.
- महापालिकेच्या हद्दीपासून ती दहा किलोमीटरच्या परिसरात अथवा नगरपालिकेच्या हद्दीपासून पाच अथवा
- एमआयडीसीच्या हद्दीपासून तीन किलोमीटर परिसरात ही जागा हवी.
- जमीनमालक अथवा सदनिकाधारकांचे एकत्रित प्रस्ताव दाखल केला पाहिजे.

प्रस्ताव मान्य झाल्यानंतर
-पीएमआरडीएकडून रस्ते, पाणी,
-विद्यूत पुरवठा, पूल, कचरा प्रकल्प,
-पावसाळी गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, क्रीडांगण, उद्याने
-आदी सुविधा पुरविण्यात येणार असून यातंर्गत हायटेक शहर विकसित करण्यात येईल.

म्हाळुंगे माण नगर नियोजन योजनेच्या धर्तीवर (टीपी स्कीम) पीएमआरडीएच्या हद्दीतून खासगी जागांवर ही योजना राबविऱ्यासाठी पीएमआरडीएकडे एकूण १२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी सात प्रस्तावांना सहमती दर्शवून खासगी, सार्वजनिक, भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मंजुरी दिली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्ष सर्व प्रक्रिया रखडली. सद्यःस्थितीत नगर नियोजन योजनेबाबत नव्याने प्रस्ताव मागविण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुन्या प्रस्तावांबाबत फेरविचार करून पुन्हा सहमतीबाबत पत्र व्यवहार करण्यात येत आहे.
- रामदास जगताप, समन्वयक, नगर रचना योजना, पीएमआरडीए

(टीपी स्कीम) धर्तीवर प्राधिकरणाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव
ठिकाण क्षेत्रफळ
(हेक्टरमध्ये)
माण ४०८
वाघोली ५१.५३
वाघोली ३५.०७
देहू निघोज ४८.४५
भूगाव ३६.२१
भुकूम ५५.२४
कार्ला ५८.६३
भावडी ४३.७६
वडाचीवाडी ४९.७
लव्हळे ५९.३
पठारवाडी ६२.३९
डावजे ७५.०४
कोंढूर ९२.२७

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com