PMRDA : पीएमआरडीएचेही आता PCMC च्या पावलावर पाऊल! घेतला मोठा निर्णय

PMRDA
PMRDATendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर (PCMC) आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेदेखील (PMRDA) प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMRDA
10 हजार कोटींच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात अजितदादांची दमदार एन्ट्री; ॲग्रीमेंट रोखले! हणमंतराव गायकवाड, सुमित साळुंखे फसले?

सर्व विभागप्रमुखांनी आपले कामकाज मराठीतूनच करण्याच्‍या सूचना आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये सामान्य नागरिकांशी केला जाणारा पत्रव्यवहार, सर्व नमुने, पत्रके, परवाने, टिप्पणी, आदेश, परिपत्रके, अहवाल आदी कार्यवृत्तांत मराठी भाषेत असणे आवश्‍यक आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

प्राधिकरण कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर एखादी व्यक्ती किंवा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतूनच लिहावीत. पदनामाचा उल्लेखही मराठी भाषेत असावा. टिप्पणी, आदेश, परिपत्रके व इतर पत्रव्यवहार यावर इंग्रजीमध्ये असणाऱ्या सह्या मराठीतच कराव्यात. निमंत्रणे मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.

PMRDA
Nagpur : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात चाललंय काय? 600 कुटुंबांचे घराबाहेर पडनेही का झाले मुश्किल?

आवश्यकता असल्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रण पत्रिका असावी. प्राधिकरणाच्या जाहिराती व टेंडर किमान दोन मराठी वृत्तपत्रातून प्रसिद्ध कराव्यात. मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिराती व निविदा मराठी भाषेत प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील माहिती मराठी भाषेत असावी.

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधिकरणाची माहिती सर्वांच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्यास संकेतस्थळावर ती केवळ इंग्रजी भाषेत न ठेवता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रसिद्ध करावी.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जनसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या माहिती अधिकार, आपले सरकार, ई-टेंडर इत्यादी ऑनलाइन सेवा किंवा पोर्टल मराठी भाषेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी मराठीचा यथायोग्य वापर करावा. मराठी वापराबाबतच्या सूचनांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी केल्या आहेत.

PMRDA
Pune : मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् चक्क पेव्हिंग ब्लॉकने बुजविले सिंहगड रस्त्यावरील खड्डे

राजभाषा मराठीचा प्रशासन स्तरावर वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाने सर्व कार्यालये, महामंडळे यांना मराठीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरून पीएमआरडीएच्या कामकाजात राजभाषा मराठीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेशी होणारा पत्रव्यवहार, कार्यालयीन कामकाज मराठीत करावे.

सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंदवह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, टिप्पणी, नस्त्या व पत्रव्यवहार यावरील शेरे, अभिप्राय, परिपत्रके, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते तसेच संकेतस्थळे मराठीत असावेत, अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com