Pune : PMPMLकडून अखेर डबलडेकर बसला मुहूर्त; टेंडर प्रक्रियेला सुरवात

Double Decker E bus (File)
Double Decker E bus (File)Tendernama
Published on

पुणे (Pune) : डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षांच्या खंडानंतर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून टेंडरप्रक्रिया सुरु होईल. २० डबलडेकरसह १०० इ-बसची खरेदी करण्यात येईल.

डिसेंबर २०२२ मध्ये ओमप्रकाश बकोरिया अध्यक्ष असताना बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात २० बस घेतल्या जातील. या बस ‘बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत.

कशी असेल नवी डबलडेकर

- नव्या बसला दोन जिने (जुन्या बसला एकच जिना)

- इलेक्ट्रिक व वातानुकूलित

- उत्तम सस्पेन्शनमुळे प्रवास आरामदायक

- डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा

- बसचा ‘लुक’ लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा

प्रवासी क्षमता जास्त

- आसन : ७० पर्यंत , उभे ४०

- एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार. त्यामुळे जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही

- बसची उंची : १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर येणार नाही.

- पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ‘एसएलएफ’ प्रकारची डबलडेकर बस होती, जिच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त होता

- नवी इलेक्ट्रिक असल्याने देखभालीचा कमी असणार

- एका बसची किंमत : २ कोटी रुपये

प्रति किमीसाठी सहा रुपये :

इलेक्ट्रिक बस एक किलोमीटर धावण्यासाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रति किमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागता. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बँकांकडून कर्ज घेणार आहे. याशिवाय पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडूनही आर्थिक साहाय्यही घेण्यात येईल.

पीएमपीची वाटचाल

एकूण बस संख्या : १६५०

रोजचे प्रवासी : १२ लाख (सरासरी )

प्रवासी उत्पन्न : १ कोटी ५० लाख (सुमारे )

रोजचा प्रवास : ३ लाख ६० हजार किमी.

एकूण मार्ग : ३७०

एकूण बस थांबे : ४,३००

पीएमपी स्वःताच्या मालकीच्या १०० इ बस घेईल. यात २० डबलडेकर असतील. पुढील आठवड्यापासून टेंडर प्रक्रियेला सुरवात होईल. या प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com