आता सारसबाग ते सिंहगड थेट ई-बस; घाट चढण्यासाठी पीएमपी 'हे' वापरणार

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : नागरिकांना सिंहगडावर जाण्यासाठी आपल्या वाहनाने पायथ्याशी जावे लागणार नाही. कारण पीएमपी आता सारसबाग ते सिंहगड दर्शन थेट ई-बससेवा सुरू करीत आहे. यासाठी सारसबाग पर्यटन डेपोदेखील विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. हा डेपो संपूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. येत्या काळात पुणे दर्शन व सिंहगडासाठी येथूनच थेट बससेवा सुरू केली जाणार आहे.

Pune
'कोणाच्या हट्टासाठी' मुंबईकरांच्या ३५०० कोटींचा चुराडा?

विविध अडचणींमुळे पीएमपीने सिंहगडावरील ई-बससेवा तूर्त बंद केली. मात्र या काळात पीएमपीने विविध स्तरांवर काम करून सिंहगडाची बससेवा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यासोबतच रस्ते सुधारणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच सारसबाग पर्यटन डेपोमुळे पीएमपीच्या पर्यटन बसला चालना मिळणार आहे. सिंहगडावर जाणाऱ्या बस इथूनच चार्ज होऊन जातील. त्यामुळे सिंहगडावरच्या चार्जिंग स्टेशनवर ताण येणार नाही. तसेच बस चार्जिंगसाठी वाटदेखील पाहावी लागणार नाही. त्यामुळे वेळेत बचत होणार आहे. एक ते दीड महिन्यांत हा डेपो विकसित होणार आहे.

Pune
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

सिंहगड घाटात काय करणार उपाययोजना

घाटातील प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्र येत काही निर्णय घेतले आहेत. यात प्रामुख्याने घाटात क्रॅश बॅरियर लावणे, कॅट आइज बसविणे, पावसाळ्यात व हिवाळ्यात बस चालविताना अडचण येऊ नये याकरिता फॉग लॅम्प बसविणे, तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तीव्र उतार कमी करून तो भाग समतल बनविणे हे काम केले जाणार आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

Pune
'त्या' ठेकेदारांना पुणे महापालिका लावणार चाप!

घाट चढण्यासाठी ‘हिल असिस्टंट’चा वापर

सिंहगड घाटात बस सुलभपणे वर चढण्यासाठी बसच्या आतच हिल असिस्टंटचा वापर करण्याचे ठरविले आहे. पहिल्यांदाच पीएमपी याचा वापर करेल. यामुळे घाटात बस वर चढण्यास सोपे जाईल. ९ मीटर लांबीच्या बसमध्येदेखील हे बसविले जाईल. तसेच नव्याने दाखल होणाऱ्या ७ मीटर लांबीच्या बसमध्येदेखील हिल असिस्टंट बसविण्यात येणार आहे. यासाठी ‘सीआयआरटी’चीदेखील मदत घेतली जाणार आहे.

सारसबाग पर्यटन डेपो विकसित करण्याचे काम सुरू आहे. येथूनच सिंहगडासाठी थेट बस सुरू होईल. बससेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. प्रवासी सुरक्षितता लक्षात घेऊन विविध उपाययोजना आखण्यात येत आहे.

- डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com