Pune : लाखो खर्च करून उभारलेल्या पीएमपीएमएलच्या बसथांब्यांना गळती

PMPML
PMPMLTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने जलद व सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी बीआरटी मार्गिका उभारण्यात आली. यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसथांबे उभारले आहेत. मात्र, या थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, निगडी ते दापोडी या मार्गावरील थांब्यांना गळती लागली आहे.

PMPML
Pune : राज ठाकरे असे का म्हणाले, तोपर्यंत शहराचा विकास होणे शक्य नाही...

निगडी ते दापोडी या साडे बारा किलोमीटरवर बीआरटी मार्गिका आहे. प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी व उतरण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल उभारले असून, निगडीतील लोकमान्य टिळक चौक, बजाज गेट, आकुर्डी, काळभोरनगर, जयश्री टॉकीज, चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट, मोरवाडी, पिंपरी, खराळवाडी, वल्लभनगर, नाशिकफाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी याठिकाणी थांबे उभारले आहेत. या थांब्यांसाठी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र, सध्या थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या थांब्यांवर साफसफाई केली जात नसल्याने अस्वच्छता झाली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने प्रवाशांना त्याठिकाणी थांबणेही अवघड होते. निगडीतील लोकमान्य टिळक चौकातील पीएमपीचा मुख्य थांबा आहे. मात्र, येथे ठिकठिकाणी उलट्या केलेली घाण साफ केली जात नाही. यामुळे प्रवाशांना अक्षरशः नाकाला रुमाल धरून थांबावे लागते. यासह वीजवाहक वायर तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच बसची वाट पाहत उभे राहावे लागते.

PMPML
Mumbai : मढ-वर्सोवा पुलाचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; 2029 कोटी रुपयांची यशस्वी बोली

प्रवाशांची गैरसोय

सध्या पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, बसची वाट पाहण्यासाठी प्रवासी बीआरटीच्या थांब्यावर थांबतात. मात्र, या थांब्याला देखील गळती लागली आहे. पाण्याच्या धारा सुरु असतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. दरम्यान, थांब्यातील फरशीवर हे पाणी साचल्यास प्रवाशाचा पाय घसरून पडण्याच्या देखील घटना घडत आहे. मोरवाडी, एम्पायर इस्टेट, चिंचवड, निगडी, खराळवाडी आदी थांब्यावर सध्या अशी स्थिती आहे.

‘‘बसथांब्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच दुरवस्था झालेल्या थांब्यांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल.

- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com