PMC Pune: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय; तब्बल 21 ठिकाणी...

Flyover
FlyoverTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची (Traffic problem in Pune) समस्या सोडविण्याबरोबरच वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिका (PMC) प्रशासनाकडून तब्बल २१ ठिकाणी उड्डाण पूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर, नदी व लोहमार्गावर पूल बांधण्यासाठी चाचपणी केली जात आहे. त्यासाठी सल्लागारांची लवकरच नियुक्ती केली जाणार असून, त्यांच्या अहवालानंतर कमी अडचणीच्या ठिकाणी संबंधित कामांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिली.

Flyover
Nashik: गुड न्यूज; बाह्यरिंगरोड पाठोपाठ 190 किमी इनर रिंगरोड

शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात त्याचा अधिक त्रास होतो. ही समस्या सोडविण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शहरातील मोठ्या रस्त्यांवर उड्डाण पूल, भुयारीमार्ग यासारखे पर्याय शोधण्याच्या दृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रहदारीच्या ठिकाणचे मोठे रस्ते, नदी व लोहमार्ग अशा विविध ठिकाणी उड्डाण पूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करून वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुुरू केले आहेत.

त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील मेट्रो मार्गिकेवर दुहेरी उड्डाण पूल तसेच गणेश खिंड रस्त्यावर भुयारीमार्गाचेही महापालिकेचे यापूर्वी नियोजन आहे. तसेच काही ठिकाणी खासगी सहभागातून (पीपीपी) पूल, भुयारीमार्गांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

Flyover
Aurangabad : अखेर 'त्या' पाच हजार कोटीच्या रस्त्याची शोभा वाढणार

शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. सध्या सुरू असलेल्या कामांसोबतच २१ ठिकाणी उड्डाण पूल, नदी व लोहमार्गावरील पूल, भुयारीमार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. अडथळे कमी असणाऱ्या १५ ठिकाणी कामे करण्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Flyover
BMCचा मोठा प्लान; ग्रँटरोड-इर्स्टन फ्रीवे अंतर अवघ्या 5 मिनिटांत

अशी आहेत संभाव्य कामे...
- मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगावशेरी नदीवरील पूल
- कोरेगाव पार्क ते कल्याणीनगरला जोडणारा पूल
- पानमळा येथून कर्वे रस्ता व सिंहगड रस्त्याला जोडणारा पूल
- पुणे स्टेशन व संगमवाडीला जोडणारा लुंबिनीनगर येथील पूल
- संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाण पूल
- येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाण पूल
- विश्रांतवाडी चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाण पूल
- सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाण पूल
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील चौकात ग्रेडसेप्रेटर
- हरेकृष्ण मंदिर येथे ग्रेडसेपरेटर
- शिवाजीनगर येथील चौकात ग्रेडसेपरेटर
- मुंढवा चौक येथे उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर
- दांडेकर पूल येथे ग्रेडसेपरेटर/उड्डाण पूल

Flyover
Riverfront : पाहायला अहमदाबादला जायची गरज नाही, आपल्या पुण्यातच..!

लोहमार्गावरील उड्डाण पूल
- घोरपडी-साधु वासवानी पूल
- कोरेगाव पार्क - ससाणेनगर येथे उड्डाण पूल/ ग्रेडसेपरेटर
- फुरसुंगी चौक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com