PM Narendra Modi : पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाची तारीख का ढकलली पुढे?

Pune Airport
Pune AirportTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलचे उद्‍घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उद्‍घाटन होणार होते. आता डिसेंबरमध्ये उद्‍घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वेळ मिळावी, असे पत्र हवाई मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला दिले आहे. एरवी विमानांना धावपट्टीवर उतरण्यास जागा नसेल, तर विमानांना चकरा (गो अराऊंड) मारायला लावतात, आता उद्‍घाटनासाठी टर्मिनललाच ‘गो अराऊंड’ मिळत आहे.

Pune Airport
Nashik : जलजीवन मिशनच्या देयकांच्या फायलींबाबत सरकारचा मोठा निर्णय; 'या' विभागाला वगळले

विमानतळ प्रशासनाने जाहीर केले नसले, तरीही पाच ते १० ऑक्टोबरदरम्यान टर्मिनलच्या उद्‍घाटनाची तयारी झाली होती. मात्र, काम अपूर्ण असल्याचे सांगत उद्‍घाटन झाले नाही. नवीन टर्मिनलच्या इमारतीचे काम झाले आहे. आता चेक इन एरिया व एक्स-रे मशिनची अतिरिक्त कामे केली जात आहेत. ही कामे नोव्हेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये उद्‍घाटन होण्याची शक्यता अधिक आहे. तारखेबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे.

विलंबाचा प्रवाशांना फटका

- विंटर शेड्यूलमुळे विमान अन् प्रवाशांची वाहतूक वाढेल

- जुन्या टर्मिनलची जागा कमी असल्याने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड होईल

- मागच्या शेड्यूलमध्ये सिक्युरिटी चेक इनसाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या

- यंदाही दिवाळीच्या काळात गर्दी वाढून प्रवाशांना रांगेत थांबावे लागू शकते

नव्या इमारतीमुळे काय होणार?

- विमान, प्रवाशांची संख्या वाढणार

- सध्याच्या टर्मिनलमधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंग

- दिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूक

- नवीन टर्मिनलवरून दररोज १२० विमानांचे उड्डाण व लँडिंग होईल

- दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांची वाहतूक होईल

Pune Airport
Pune Nashik Expressway : असा असेल पुणे - नाशिक द्रुतगती प्रवास! पहा काय काय बदलणार?

असे आहे नवे टर्मिनल

क्षेत्रफळ : सुमारे ६०,००० चौरस फूट

प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख

एरोब्रिज : ५

एकूण खर्च : ५२५ कोटी

तासाला : २३०० प्रवाशांची क्षमता

Pune Airport
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी अखर्चित असल्याने राज्यातील ग्रामपंचायतींचे रोखले 712 कोटी

नवीन टर्मिनलमध्ये अजूनही काही छोटी-मोठी कामे सुरूच आहेत. उद्‍घाटन कधी होईल, या बाबत काही सांगता येणार नाही. हवाई मंत्रालय व पंतप्रधान कार्यालय यांच्यात संवाद सुरू आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

विंटर शेड्यूलमध्ये प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन टर्मिनलचे उद्‍घाटन लवकर होणे गरजेचे आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com