पुणे मेट्रोची फेज 2 सुरू; खडकवासला ते खराडी 25 KMचा एकच कॉरिडॉर...

Pune Metro
Pune MetroTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) सार्वजनिक सेवेचा विस्तार करण्यासाठी महामेट्रोने (MahaMetro) फेज दोनमधील चार मार्गांच्या डीपीआरचे (DPR) पुणे महापालिकेला (PMC) सादरीकरण झाले. यामध्ये खडकवासला ते खराडी, एसएनडीटी ते वारजे-माणिकबाग, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि संपूर्ण पुणे शहराला वळसा घालणाऱ्या निओ मेट्रोवर (Metro Neo) चर्चा करण्यात आली. फेज दोनमधील हा संपूर्ण प्रकल्प ८८.३५ किलोमीटर लांबीचा असून, यासाठी १६ हजार ९५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मंगळवारच्या बैठकीनंतर या मार्गात काही बदल होणेही शक्य आहे. महापालिकेने हे प्रस्ताव मान्य केल्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या मंजुरीनंतर या प्रकल्पांचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Pune Metro
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात ठेकेदाराचा हलगर्जीपणा

राज्य सरकारने महामेट्रोला पुण्यातील फेज दोनमधील मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामेट्रोने काम करून काही दिवसांपूर्वी हे डीपीआर महापालिकेला सादर केले. त्यानंतर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Pune Metro
सिन्नर माळेगाव एमआयडीसीत 40 एकर जमीन घोटाळा; कोणी केली तक्रार?

खडकवासला ते खराडी (२५ किलोमीटर)
महामेट्रोने खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते खराडी असे तीन स्वतंत्र प्रस्ताव महापालिकेला सादर केले आहेत. पण खडकवासला ते खराडी हा एकच कॉरिडॉर तयार होणार आहे. हा संपूर्ण २५ किलोमीटरचा मार्ग इलोव्हेटेड असणार आहे. या दरम्यान, २८ स्टेशन असणार आहेत. खडकवासला, सिंहगड रस्ता, स्वारगेट, सेव्हन लव्ह चौक, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेस कोर्स, हडपसर, मगरपट्टा, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर चौक, खराडी चौक असा असणार आहे. स्वारगेट येते गणेश कला क्रीडा मंच येथे मेट्रो स्टेशन असले. तेथून भूमीगत मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग केला जाणार आहे. हा मेट्रो मार्ग जास्तीत जास्त शासकीय जागेतून जाईल यासाठी प्रयत्न केला आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.

Pune Metro
मेट्रो रेल्वे करणार नागपूर कलेक्टर ऑफिसचे बांधकाम; 200 कोटींचे...

एसएनडीटी ते वारजे-माणिकबाग (६ किलोमीटर)
पौड फाटा ते वारजे-माणिकबाग हा मार्ग खडकवासला ते स्वारगेट आणि वारजे ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गांना जोडणारा दुवा ठरणार आहे. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, वारजे परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. हा मार्ग ६.११ किलोमीटरचा असून यासाठी यामध्ये सहा स्टेशन असणार आहे. पौड फाटा येथून ही मेट्रो वारजे येथे आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मुठा नदीचा पूल ओलांडून ती सिंहगड रस्त्यावर वडगाव येथे माणिकबाग स्टेशनला जोडली जाणार आहे. खडकवासला ते खराडी आणि एनसएनडीटी ते माणिकबाग या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार १५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

Pune Metro
सिडकोच्या 'त्या' २५० एकरवरील हिल टाऊनशिपच्या वाटेत काटे

कोथरूड व वाघोलीत विस्तार (१३.२ किलोमीटर)
वनाज ते रामवाडी या मेट्रोचा विस्तारित मार्ग तयार केला आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक असा १.२ किलोमीटर आणि रामवाडी ते वाघोली हा १२ किलोमीटर याचा समावेश आहे. यासाठी ३ हजार ३२८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Pune Metro
EXCLUSIVE : फडणवीसांच्या खात्यात भ्रष्टाचाराचे टोक;टक्केवारीसाठी..

निओमेट्रो (४३.८४ किलोमीटर)
पुणे शहरात सर्वत्र मेट्रो मार्गांचे जाळे तयार केले जाणार आहे. पण उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) ४३.८४ किलोमीटरची निओ मेट्रो प्रस्तावित केली आहे. ही निओ मेट्रो इलोव्हेटेड असून, रबरी चाकांवर ती धावणार आहे. यासाठी ४ हजार ९४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Pune Metro
अबब! नाशिकमध्ये होणार 42 मजली मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब

पुणे महापालिकेसोबत फेज दोनबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. हे सर्व मेट्रो मार्ग व निओ मेट्रोचा मार्ग जास्तीत जास्त शासकीय जागेतून जाईल यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.
- अतुल गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com