PCMC : 'त्या' आयटीयन्सना का हवीय मेट्रो?

Pune
PuneTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करण्यात आला. रस्ते खराब असले तरी मेट्रो सुरू झाल्यावर हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा येथे येणाऱ्या आयटीयन्सला होती. पण मेट्रो मार्ग हा हिंजवडी-बाणेर-शिवाजीनगर असल्याने प्रत्यक्षात त्याचा पिंपरी-चिंचवडकरांना फायदा झाला तर नाहीच.

मेट्रोच्या संथगतीने चाललेल्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांपासून हिंजवडीपर्यंत मेट्रो मार्ग विकसित व्हावा अशीही मागणी आयटीयन्स करत आहेत.

Pune
'शक्तीपीठ'पाठोपाठ 25 हजार कोटींच्या 'त्या' 2 प्रकल्पांनाही ब्रेक! भूसंपादन प्रक्रिया रद्द

हिंजवडी, पुनावळे, वाकड या भागात लोकसंख्या वाढली आहे. मात्र, तुलनेने रस्ते अत्यंत अरुंद व खराब आहेत. त्यामुळे परिसरातून हिंजवडी किंवा कुठेही जायचे असेल तरी खराब रस्ते व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पायाभूत सुविधा तर नाहीतच मात्र समस्या वाढत आहेत. अनेक रस्त्यांचे प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

- सुमीत ढगे, आयटीयन व रहिवासी, पुनावळे

Pune
Dharavi Redevelopment : ‘धारावी बचाव’ आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘डीआरपीपीएल’चा भूमिपूजन कार्यक्रम रद्द!

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड महापालिका एकत्रितरीत्या किवळे ते वाकड दरम्यानच्या सेवारस्त्याचे काम करणार आहे. त्यासोबतच किवळे बालेवाडी उन्नत मार्गासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून २०२४-२५ मध्ये टेंडर काढल्या जातील. त्यापूर्वी कॅबिनेटकडून या प्रकल्पाला मान्यता मिळणे अनिवार्य आहे.

- अंकित यादव, उपव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे

Pune
Tendernama Impact: 'भूखंडावर ताव मारा अन् तृप्त व्हा'! लाडक्या मंत्र्यांसाठी सरकारची नवी योजना; संजय राठोड, 'बिल्डरमंत्री' हे लाभार्थी

किवळे-बालेवाडी प्रस्तावित उन्नत मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या देहूरोड ते वाकड पट्ट्यातील खराब सेवा रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. मुंबई-बंगळूर महामार्गावरील किवळे, रावेत, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडे, वाकड या पाच ठिकाणी वाहतुकीचे कोंडी होऊ नये यासाठी चांदणी चौकाप्रमाणे उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या महामार्गाचे काम करणारी पूर्वीचे कंत्राटदार न्यायालयात गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ते कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ

Pune
Pune : जागतिक दर्जाच्या आयटी पार्कला वाहतूक कोंडीचा विळखा? जबाबदार कोण?

मी दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांसोबत या भागातील सेवा रस्त्यांची पाहणी केली. सेवा रस्त्यांचे काम येत्या काही दिवसांत सुरू होईल. अंतर्गत रस्त्यांचे कामही लवकरच सुरू केले जाईल.

- अश्‍विनी जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com