पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए - PMRDA) व दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे प्रतिज्ञापत्र व बोगस दस्त तयार करून एका व्यक्तीची ४६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ५७ संशयितांवर न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या साडेबारा टक्के परतावा क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी विनायक पंढरीनाथ भोंगाळे (६५, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारुती ज्ञानोबा सस्ते (५९, रा. चऱ्होली खुर्द, आळंदी देवाची, ता. खेड) व इतर ५६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.