PCMC : ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे 5 जलतरण तलाव बंद; काय आहे कारण?

Swimming Pool
Swimming PoolTendernama
Published on

पुणे (Pune) : पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलावांची वरचेवर आणि प्रदीर्घकाळ चालणारी देखभाल-दुरुस्तीची कामे जलतरणप्रेमींच्या हौसमौजेवर ‘पाणी’ फिरवत आहेत. एकीकडे प्रचंड शुल्कवाढ करुनही देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेवर निश्चित मुदतीत पूर्ण होत नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाच जलतरण तलाव बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेच्या क्रीडा विभागावर आली आहे.

Swimming Pool
Sambhajinagar : शिवाजीनगर भुयारी मार्गात जीव्हीपीआरचे वराती मागून घोडे; महापालिका, मजीप्राचा...

जलतरणप्रेमी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहर परिसरात तेरा जलतरण तलाव बांधले आहेत. या सर्व तलावांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे मुख्यत्वे स्थापत्य आणि विद्युत विभागांकडून केली जातात. मात्र, योग्य नियोजन न केल्याने आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निश्चित मुदत नसल्याने अनेकदा ही कामे सलग अनेक वर्षे चालत असल्याचे दिसून येते. त्याने, जलतरणप्रेमींच्या हौसमौजेवर पाणी फिरले जात आहे.

अलीकडेच काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने अनेक वर्षे शुल्कवाढ केली नसल्याचे कारण देत प्रचंड शुल्कवाढ लागू केली. मात्र, दुसरीकडे तेवढ्याच तत्परतेने आणि कार्यक्षमतेने नागरिकांना सेवा देण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या उन्हाळ्याच्या हंगामात तापमान झपाट्याने वाढत असताना पाच जलतरण तलावाची स्थापत्य, विद्युत आणि देखभाल विषयक कामे सुरू असून त्यासाठी हे तलाव सुमारे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहेत.

Swimming Pool
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' ड्रिम प्रोजेक्टला त्यांच्याच कार्यकाळात का लागली घरघर?

देखभाल दुरुस्तीची बोंब नेहमीच

काही जलतरण तलाव चालविण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नसल्याने त्याची टेंडर काढून ते खासगी संस्थेला देखभाल दुरुस्तीसाठी दिले जातात. पण, या जलतरण तलावातील फरशा तुटणे, गळती होणे, जलशुद्धीकरण यंत्रणा खराब होणे आदी कारणांमुळे जलतरण तलाव बंद पडतात. काही जलतरण तलावात पिंपळ, वड, बाभूळ अशी झाडे उगवली आहेत. ते काढण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने नळ, दिवे, पत्र्याचे शेड, लोखंडी बार यासह इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. तळीरामांना दारू पिण्यासाठी हक्काची जागा मिळत आहे.

सध्या सुरू असणारे तलाव

नेहरूनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळे गुरव येथील कै.काळूराम जगताप, पिंपरी वाघेरे, कासारवाडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील कै. बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई ॲक्वामरिन हे आठ तलाव सुरू आहेत.

बंद असलेले जलतरण तलाव

थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, आकुर्डी-प्राधिकरणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत. त्यांची अवस्था सुधारण्यासाठी आणखी काही कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याची तरतूद अर्थसंकल्पात झाली; तर जलतरण तलावांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

Swimming Pool
Konkan Expressway : मुंबई-गोवा हायवे आता विसरा; MSRDC देणार सुसाट प्रवासाचे 2 नवे पर्याय

स्थापत्यविषयक कामांमुळे पाच तलाव बंद आहेत. जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीवर खूप खर्च येत आहे. तुलनेत उत्पन्न कमी आहे.

- अनिता केदारी, क्रीडा अधिकारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com