आता पुण्यातच घ्या लंडनसारखा अनुभव; PMPचा लवकरच 'डबल धमाका'

E bus
E busTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून पीएमपी प्रशासन डबल डेकर बस सेवा सुरू करणार आहे. ही बस इलेक्ट्रिक व वातानुकूलित असणार आहे. पहिल्या टप्यात पीएमपी प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्या ५० डबल डेकर बस घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी दोन्ही महापालिकांचे आर्थिक साह्याय्य घेतले जाईल. नवी बस लंडनच्या रस्त्यावर धावणाऱ्या डबल डेकर प्रमाणे दिसणारी आहे. शिवाय डेक वर जाण्यासाठी दोन जिने असणार आहे.

E bus
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

‘पीएमपीच्या’ अनेक मार्गावर सायंकाळी विशेष करून सहा ते आठ या वेळेत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने डबल डेकरची सेवा सुरू करणार आहे. डबलडेकरची बसच्या उंची १४ फूट ४ इंच आहे. त्यामुळे ही बस केवळ बीआरटी मार्गावरून धावणार नाही. बीआरटी मार्ग वगळता ही बस शहराच्या कोणत्याही मार्गावरून धावू शकते. पीएमपीच्या अध्यक्षांनी नुकतेच या संबंधी वाहतूक विभागाला आदेश दिले असून त्या दृष्टीने आता हालचाल सुरू झाली आहे. येत्या बीओडीमध्ये याला मंजुरी मिळेल. त्यानंतरच पीएमपी प्रशासन याची अधिकृत घोषणा करणार आहे.

E bus
साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 15 तारखेपर्यंत...

...अशी आहे डबल डेकर बस
- नव्या बसला दोन जिने,
- जुन्या बसला केवळ एकच जिना होता.
- इलेक्ट्रिक व वातानुकूलित
- बसमध्ये उत्तम सस्पेन्शन, त्यामुळे प्रवास आरामदायक.
- बसमध्ये डिजिटल टिकेटिंगची सोय असेल
- बसचा लुक लंडनमध्ये धावणाऱ्या बस सारखा.

E bus
पुणे महापालिकेची डोकेदुखी संपणार; पदभरतीच्या प्रक्रियेत 'हा' बदल

असे असेल स्वरूप
- प्रवासी क्षमता : सीटिंग ७० पर्यंत, उभे राहून ४० प्रवासी
- एकाच वेळी किमान शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील.
- पीएमपीला जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही.
- बसची किंमत २ कोटी रुपये.
- बसची उंची १४ फूट ४ इंच
- मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर होणार नाही
- पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ‘एसएलएफ’ प्रकारची डबल डेकरची बस होती. त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जास्त होता.
- नवी बस इलेक्ट्रिक आहे. त्याच्या देखभालीचा खर्च खूप कमी आहे.

E bus
धोकादायक ठरविलेल्या रामसेतूला स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जीवदान

प्रति किमीसाठी सहा रुपये
इलेक्ट्रिक बसच्या एक किमीसाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र, मक्तेदाराच्या बसला प्रति किमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बँकाकडून कर्ज घेणार आहे. शिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आर्थिक साहाय्य देखील घेणार आहे. स्वतःची बस असेल तर नक्कीच पीएमपी फायद्यात येईल.

E bus
घरकुल परत जाऊ नये म्हणून 'या' ग्रामपंचायतीने काय केले पाहा

पीएमपीच्या वाहतूक विभागाला डबल डेकर सेवा सुरू करण्याविषयी मार्गाची निवड व अन्य बाबीचा विचार करून अहवाल देण्यास सांगितले आहे. डबल डेकर बसमुळे नक्कीच प्रवाशांना फायदा होईल. तेव्हा आम्ही ही सेवा सुरू करण्यास आशावादी आहोत.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com