Nitin Gadkari: मुंबई पुणे प्रवास आणखी वेगवान होणार का? काय म्हणाले नितीन गडकरी?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

पुणे (Pune) : मुंबईतील अटल सेतूपासून (Atal Setu) मुंबई-बंगळूर (Mumbai Bengaluru Expressway) हा १४ पदरी द्रुतगती मार्ग नव्याने बांधण्यात येणार असून, तो पुणे रिंगरोडला (Pune Ring Road) जोडणार आहे. या नव्या मार्गाचे टेंडर निघाले आहे. येत्या सहा महिन्यांत त्याचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यात केली.

Nitin Gadkari
Tendernama EXclusive: शिंदे सरकारची हवाई प्रवासावर कोट्टीच्या कोटी उड्डाणे; 2 वर्षांत तिप्पट वाढ

मुंबईहून निघालेली अनेक वाहने पुण्यात न येता नव्यामार्गे पुढे जातील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आणि यामार्गे शहरात येणारी वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला. त्यामुळे येत्या काळात मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होण्याची चिन्हे आहेत.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळा गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, ‘‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधला, त्यावेळी पुढील ५० वर्षांत आपल्याला काही करावे लागणार नाही, असे आम्ही म्हणायचो. नागपूरमधून मी निघालो आणि पुण्यात पोहोचलो; पण माझा मुलगा आणि सून मुंबईमधून निघाले आणि लोणावळ्यात एक तास अडकले.

मुंबईतील अटल सेतू पुलावरून उतरल्यावर तेथून थेट बंगळूरला जाणारा एक १४ पदरी द्रुतगती मार्ग बांधण्याचे टेंडर निघाले आहे. हा मार्ग थेट मुंबईहून निघून पुण्याच्या रिंगरोडला जोडून मुंबई-पुणे रिंगरोड मार्गे बंगळूर असा असेल. यामुळे सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अर्ध्याहून अधिक वाहतूक या मार्गाने पुढे जाईल.

मुंबईतील अटल सेतूवरून खाली उतरल्यास लगेचच वाहने १४ पदरी मुंबई-बंगळूर मार्गाला लागतील, याचमार्गाने पुणे रिंगरोडमार्गे पुढे बंगळूरला जाणे शक्य होईल. या रस्त्याने पुढे दोन तासांत वाहने छत्रपती संभाजीनगर रस्त्याला जोडली जातील, असे गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari
Mumbai : वर्सोवा खाडीवरील प्रस्तावित पुलाचे टेंडर 'या' कंपनीने पटकावले; 2029 कोटींची यशस्वी बोली

गडकरी म्हणाले...
- पुढील पाच वर्षांत नागरी वाहतुकीत डिझेल गाड्या दिसणार नाहीत, सर्वत्र इलेक्ट्रिक वाहने असतील
- एक सोडल्यास जगातील सर्व ॲटोमोबाईल ब्रॅंड देशात आहेत. पुढील काळात आपण या क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकू
- ‘लिथियम आयर्न बॅटरी’चा जगातील सहावा साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडला आहे
- नजीकच्या दोन वर्षांत सेमी कंडक्टर क्षेत्रात भारत जगातील नंबर एकचे उत्पादक हब बनेल
- नवे तंत्रज्ञान समाजाचा विकास करणारे, गरीब माणसाचे जीवन बदलणारे असले पाहिजे
- विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधन, इनोव्हेशन यावर त्या-त्या देशाचा विकास, प्रगती मोजली जाते.

Nitin Gadkari
Pune : पुण्यातील टँकरमाफियांच्या वाढत्या दहशतीला जबाबदार कोण?

भारतात विनाचालक वाहने येणार नाहीत. देशातील तब्बल २२ लाख वाहनचालकांना रोजगार मिळत आहे. विनाचालक गाड्या आल्यास चालकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यांच्या नोकऱ्या गेल्यास मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मी असेपर्यंत देशात विनाचालक वाहने येणार नाहीत.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com