Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

Nitin Gadkari : साहेब, पुणे - छत्रपती संभाजीनगर ग्रीन फिल्ड महामार्गाचे नेमके काय झाले?

Published on

पुणे (Pune) : पुणे - छत्रपती संभाजीनगर हा प्रचंड वर्दळीचा महामार्ग झाला आहे. चौपदरी सुसज्ज मार्ग असला तरीही ठिकठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यातच वाहनांची वर्दळ यामुळे सततच्या वाहतूक कोंडीने पाच तासाचा प्रवास सात ते आठ तासांवर पोहचला आहे.

Nitin Gadkari
'आनंदाचा शिधा'; 'स्मार्ट' ठेकेदारावर 50 कोटींची अतिरिक्त खैरात अंगलट

छत्रपती संभाजी, पैठण, शेवगाव, पाथर्डी, नगर, पुणे या ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गाची रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेली आहे. हा मार्ग झाला तर छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे अंतर दोन ते अडीच तासांवर येईल, असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात या मार्गाच्या सर्वेक्षणाशिवाय अद्याप काहीही हालचाली झालेल्या नाहीत.

Nitin Gadkari
‘एक राज्य एक गणवेश’ शाळा आणि शिक्षकांच्या चांगलाच अंगलट; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमुळे...

अडचणींचा सामना

- छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा महामार्ग पुणे ते शिरूर, शिरूर ते नगर आणि नगर ते छत्रपती संभाजीनगर अशा तीन टप्प्यांत

- पुणे ते शिरूर हा मार्ग दर्जेदार आहे, मात्र शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा रस्ता खड्डेमय

- ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांना बुजविण्यासाठी केलेल्या मलमपट्टीचा एवढा अतिरेक झाला की या मार्गावर सलग अर्ध्या किलोमीटरचा गुळगुळीत रस्ता सापडत नाही

- वाहने उड्या मारत चालल्याचा अनुभव प्रवाशांना येतो

- छत्रपती संभाजीनगर- पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या ४०० बसगाड्यांचा भार. खासगी बस सेवा, खासगी मोटारी अन इतर वाहनांचीही वर्दळ

- छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर दररोज एक लाख प्रवाशांचा प्रवास

- पुणे जिल्ह्यातील शिरूर ते छत्रपती संभाजीनगर खड्ड्यांची मालिका

Tendernama
www.tendernama.com