शरद पवार असे का म्हणाले, पूर्व पुण्यासाठी नव्या महापालिकेचा निर्णय घेण्याची गरज

Sharad Pawar
Sharad PawarTendernama
Published on

पुणे (Pune) : ‘‘पुणे महापालिकेचा विस्तार वाढत असून, नवीन समाविष्ट गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. याबाबत सर्वांनी एकत्रित येऊन पुणे शहराच्या पूर्व भागासाठी नवीन महापालिकेबाबत निर्णय घेण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

Sharad Pawar
Mumbai : शेतकरी, निर्यातदारांसाठी गुड न्यूज! 285 कोटी खर्चून JNPT मध्ये उभारणार 'हा' महत्त्वाचा प्रकल्प

वानवडीमधील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवनात रविवारी (ता. २८) सातारा जिल्हा मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. या प्रसंगी सातारा जिल्हा मित्र मंडळ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. पवार यांच्या हस्ते यशवंत साळुंखे यांना ‘अजिंक्यतारा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर आदिती गोपीचंद स्वामी यांना ‘कृष्णा-कोयनामाई पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, जगन्नाथ बापू शेवाळे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, अभिजित शिवरकर, प्रवीण तुपे, जे. पी. देसाई, एस. बी. पाटील, अण्णा साळुंखे, दशरथ जाधव, संदीप साळुंखे आदी या वेळी उपस्थित होते.

Sharad Pawar
Mumbai : मढ-वर्सोवा पुलाचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; 2029 कोटी रुपयांची यशस्वी बोली

‘‘सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून वाद सुरू असून, त्यात आपण मध्यस्थी करावी. तसेच, पुणे शहराच्या पूर्व भागासाठी नव्या महापालिकेची गरज असून, त्याबाबत विचार व्हावा,’’ अशी मागणी शिवरकर यांनी पवार यांच्याकडे केली.

हडपसर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा

शरद पवार यांनी माजी नगरसेवक शिवरकर यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आगामी निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com