मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा अंतिम आराखडा सादर

Highspeed Railway
Highspeed RailwayTendernama
Published on

पुणे (Pune) : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा (डीपीआर) राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचआरसीएल) अखेर रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. मंत्रालयाकडून कडून तो रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून, तेथे मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या प्रक्रियेमुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Highspeed Railway
Mumbai : साडेतीन लाख विद्यार्थ्यांना 20 कोटींचे शालेय साहित्य मोफत

रेल्वेचा मार्ग ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील लोणावळा, देहू सासवड या भागातून जातो. मात्र ‘पीएमआरडी’च्या विकास आराखड्यात तो प्रस्तावित करण्यात आला नव्हता. तो समाविष्ट करावा, यासाठी रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी ‘पीएमआरडीएला पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित विकास आरखड्यात हा मार्ग दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली. परंतु हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतूनदेखील जातो. फुरसुंगी येथे महापालिकेडून दोन नगर रचना योजना (टीपी स्किम) प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यापैकी एका नगर रचना योजनेचे प्रारूप महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

Highspeed Railway
Old Mumbai Pune Road: 'या' ठिकाणची कोंडी अखेर फूटली

मात्र, फुरसुंगीमधील दुसऱ्या नगर रचना योजनेचे काम अद्याप सुरू आहे. ही दोन गावे वगळता उर्वरित गावांच्या विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र नगर रचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेकडून हा रेल्वे मार्ग दर्शविण्यात आलेला नाही. महापालिकेने त्यास मान्यता दर्शविल्यानंतर सल्लागार कंपनीकडून या रेल्वेच्या मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो कॉर्पोरेशनकडे सादर केला होता. मात्र कॉर्पोरेशनकडून त्यांच्या छाननीचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेशनकडून तो आराखडा रेल्वे मंत्रायलयाकडे सादर करण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Highspeed Railway
Pune Ring Road: स्वत:हून जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त मोबदला; कारण...

अशी असेल हायस्पीड रेल्वे

- राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन

- त्यात मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प

- ही रेल्वे तासी २५० ते ३२० किलोमीटर वेगाने धावणार

- मुंबई ते हैदराबाद असा सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर

- हे अंतर ही रेल्वे साडेतीन तासांत कापणार

- या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असतील

- या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकणार

प्रकल्पाच्या ठळक बाबी

- प्रकल्पाचा अंदाजे खर्च : १४००० कोटी रुपये

- प्रवासी क्षमता : ७५०

- मुंबई-हैदराबाद मार्गाची लांबी : ७११ किलोमीटर

- ब्रेकिंग सिस्टिम, तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस)

- काही मार्ग एलिव्हेटेड, तर काही भुयारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com