Mumbai Pune Expressway : नियम मोडणाऱ्यांना आता दणका! संपूर्ण 94 किलोमीटरवर...

Expressway
ExpresswayTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आयटीएमएस सिस्टीमचे काम पूर्ण झाले असून, वाहतूक नियमांचे पालन न करणारे वाहनचालक दंडात्मक कारवाईला पात्र ठरणार आहेत. ‘आयटीएमएस’मुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

Expressway
Pune : दीड वर्षांच्या टोलवाटोलवीनंतर अखेर 'त्या' प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघाताची सुरक्षा विचारात घेऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने संपूर्ण ९४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर आयटीएमएस प्रणाली बसवण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. ते सध्या पूर्ण झाले असून ही पद्धत नुकतीच सुरू केली आहे.

आयटीएमएस म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम. या पद्धतीमध्ये सॅटेलाईटद्वारे संपूर्ण माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ कळते. यासाठी ९४ किलोमीटर अंतरावराच्या रस्त्यावर संभाव्य अपघातग्रस्त १०६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे आयटीएमएस पद्धतीने सॅटेलाईटद्वारे कुसगाव येथील नियंत्रण कक्षाला जोडले आहेत.

Expressway
Nagpur : मुख्य रेल्वे स्थानक होणार जागतिक दर्जाचे पण 24 महिन्यांत केवळ 35 टक्केच काम

या पद्धतीमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या सर्व हालचालींची माहिती कॅमेऱ्यात कैद होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करणारे, अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग आदींसह अपघात झाला किंवा कोणतीही घटना घडली तर याची माहिती नियंत्रण कक्षाला तत्काळ कळते. त्यामुळे काही मिनिटांत अपघातग्रस्तांना मदत पुरवणे शक्य झाले आहे.

या प्रणालीमुळे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड बसत असून, वाहन प्रकारानुसार किमान पाचशे ते दोन हजार रुपये दंड हा भरावा लागत आहे.

अनेकवेळा बोरघाटात वेग मर्यादेचा विसर पडलेले वाहनचालक रस्ता मोकळा असल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट जातात, याची नोंद नियंत्रण कक्षाला होत असते. नियंत्रण कक्षाकडून यांची संपूर्ण माहिती आरटीओ व विशेष दंडात्मक कारवाई करणाऱ्या पथकाकडे जाते. त्यांच्यामार्फत नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकास दंडाचा भुर्दंड बसत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com